Neena Gupta : नीना गुप्ता यांच्या 'फिटनेस'चे गुपित, व्हिडिओवर फॅन्सच्या कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:39 PM2022-11-29T16:39:31+5:302022-11-29T16:40:56+5:30
बॉलिवुडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या उत्साहाला तोड नाही. या वयात सुद्धा त्या इतक्या जास्त सक्रीय आहेत. एकामागोमाग एक चित्रपट करत आहेत.
Neena Gupta : बॉलिवुडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या उत्साहाला तोड नाही. या वयात सुद्धा त्या इतक्या जास्त सक्रीय आहेत. एकामागोमाग एक चित्रपट करत आहेत. यावरुनच कळते त्या आपल्या फिटनेसवर किती जास्त लक्ष देत असणार. नीना गुप्ता यांनी नुकताच Workout वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ Instagram इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण व्यायामासाठी प्रेरित होतील.
नीना गुप्ता यांच्या फिटनेस चे नेमके गुपित काय ?
नीना गुप्ता यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्या पुशअप्स करताना दिसत आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत ट्रेनरही दिसतोय. अशा प्रकारचा व्यायाम अपर बॉडी ट्रेन करण्यासाठी केला जातो. त्यांनी ट्रेनरची मदत घेऊन पुशअप्स केले. यामुळे चेस्ट, ट्रायसेप्स अणि शोल्डर्स ट्रेन होतात.
या व्हिडिओ खाली त्यांनी कॅप्शन लिहिले, 'आताच सुरु केले आहे फक्त show off शो ऑफ करतीये.' चाहत्यांनी त्यांच्या या प्रयत्नाला सलाम केला आहे. तुम्हाला तर याची गरजही नाही, पण फिट राहणे चांगले आहे अशी कमेंट एकाने केली आहे.
नीना गुप्ता यांचा ऊॅंचाई हा सिनेमा नुकताच आला होता. अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इरानी यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.