वय वर्षे 62 पण अजूनही तरूण...! नीना गुप्तांनी बोल्ड अंदाजात केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 11:37 AM2021-09-01T11:37:55+5:302021-09-01T11:39:47+5:30
नीना गुप्ता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. अगदी बेली डान्सपासून तर ग्लॅमरस, बोल्ड फोटोंपर्यंत त्यांच्या पोस्ट पाहून चाहतेही थक्क होतात. सध्या त्यांचा असाच एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होतोय.
वय वर्षे 62, पण उत्साह अगदी तरूणाईला लाजवेल असा..., आम्ही बोलतोय ते अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्याबद्दल. नीना गुप्ता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. अगदी बेली डान्सपासून तर ग्लॅमरस, बोल्ड फोटोंपर्यंत त्यांच्या पोस्ट पाहून चाहतेही थक्क होतात. सध्या त्यांचा असाच एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. (Neena Gupta Video)
नीना यांनी अलीकडे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नीना यांनी काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. ‘आज फिर जिने की तमन्ना है’ या गाण्यावर नीना डान्स करताना दिसत आहेत. 62 वर्षांच्या नीनांचा हा अंदाज पाहून चाहते अगदी घायाळ झाले आहेत. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केली आहे.
नीनांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच त्या ‘83’, ‘ग्वालियर’, ‘गुडबाय’ अशा सिनेमात दिसणार आहेत.
4 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या नीना यांनी ‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. नीना गुप्ता आपल्या पर्सनल लाईफला घेऊन देखील तितक्याच चर्चेत राहिल्या. वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतला .
8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. वेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर विवियन त्यावेळी विवाहित होता. पण ना नीना यांनी त्याची पर्वा केली, ना विवियनने. दोघांचीही संस्कृती, आचार-विचार, आयुष्य सगळे काही भिन्न होते. विवियन नीनाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण त्याला आपले लग्नही तोडायचे नव्हते. त्यामुळे त्याने नीनासोबत लग्न करण्याचा विचार बाजूला केला. लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. सुरूवातीला त्यांच्या स्वत:च्या कुटुंबानेही त्यांना जवळ केले नाही. नीना प्रेग्नंट असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर मात्र नीनाच्या वडिलांनी मुलीला आधार दिला. ते दिल्लीहून मुंबईला मुलीसोबत राहायला आलेत.