ब्रेस्टसंदर्भात नीना गुप्तांच्या बोल्ड स्टेटमेंटनं कपिल शर्माची केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:58 PM2022-01-24T14:58:21+5:302022-01-24T14:58:50+5:30

नीना गुप्ता (Neena Gupta)यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे.

Neena Gupta's bold statement regarding breasts, Kapil Sharma shocked | ब्रेस्टसंदर्भात नीना गुप्तांच्या बोल्ड स्टेटमेंटनं कपिल शर्माची केली बोलती बंद

ब्रेस्टसंदर्भात नीना गुप्तांच्या बोल्ड स्टेटमेंटनं कपिल शर्माची केली बोलती बंद

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. नीना गुप्ता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच नीना गुप्ता यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

नीना गुप्ता 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)मध्ये दिसल्या होत्या. यावेळी कपिल शर्मा (Kapil Sharma)ने नीना गुप्ता यांना सांगितले होते की, आम्ही ऐकले होते की तुम्हाला 'बेवॉच'मध्ये पामेला अँडरसनची भूमिका करायची होती. त्यावर उत्तर देताना नीना गुप्ता म्हणाल्या की, "अरे, माझ्याकडे इतके मोठे ब्रेस्ट नाहीत, मग मी हा रोल कसा करू शकते." नीनाचे उत्तर ऐकून पाहुणे आणि प्रेक्षकांना हसू आवरले नाही. हे उत्तर ऐकण्यापूर्वी काही पाहुण्यांनी कान बंद केले, तर काही मोकळेपणाने हसले. नंतर कपिलने नीना यांना म्हटले की हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि इथे नॉनव्हेज चर्चा होत नाही. त्यावर  नीना गुप्ता म्हणाल्या की तू नॉनव्हेज प्रश्न का विचारतोस. त्यांचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आगामी प्रोजेक्ट
दरम्यान, नीना गुप्ता शेवटच्या '८३'मध्ये पाहायला मिळाल्या होत्या. याआधी त्या 'ग्रँड सन' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' यासारख्या चित्रपटात दिसल्या आहेत. याशिवाय 'मसाबा मसाबा' या वेबसिरीजमध्येही त्यांनी काम केले आहे. लवकरच त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अलविदा' चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Neena Gupta's bold statement regarding breasts, Kapil Sharma shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.