सिंगर नीति मोहन होणार आई, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत दिली गुड न्यूज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 16:57 IST2021-02-15T16:51:16+5:302021-02-15T16:57:55+5:30
Singer Neeti Mohan announce her pregnancy news with her fans : सिंगर निती मोहन लवकरच आई होणार आहे.

सिंगर नीति मोहन होणार आई, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत दिली गुड न्यूज !
सिंगर निती मोहन लवकरच आई होणार आहे. ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार. अलीकडेच त्याने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. इन्स्टाग्रामवर तिने बेबी बॅम्प फ्लॉन्ट करतानाचे पती निहार पांड्यासोबतच काही खास फोटो शेअर केले आहेत.
दोघेही समुद्राच्या किनाऱ्यावर पोज देताना दिसतायेत. नितीने पिवळ्या रंगाच्या ड्रेस परिधान केला आहे. तर निहारने फिकट गुलाबी रंगाच्या शर्टसह जीन्स घातली आहे. एका फोटोत निहार नीतीच्या बेबी बम्पला किस करताना दिसतोय. विशेष म्हणजे नीति आणि निहारच्या लग्नाची आज दुसरी अॅनिव्हर्सरी आहे.
2019मध्ये झाले होतं लग्न
निती मोहन आणि निहार पंड्या यांनी 15 फेब्रुवारी 2019 रोजी सात फेरे घेतले होते. दोघांचं लव्हमॅरेज आहे. या शाही लग्नाची चर्चा हैदराबादमध्ये खूूप झाली होती. लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नीति एक गोड गळ्याची गायिका आहे, तर निहार मणिकर्णिकासारख्या चित्रपटांचा एक भाग असलेले एक उत्तम अभिनेता आहे., स्टुडंट ऑफ द इयरसह बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशाल शेखरने या गाण्याचे संगीत दिले होते. त्यानंतर त्याने जब तक है जान का जिया रे हे गाणे गायले. याशिवाय तिने अनेक हिट गाणी दिली आहेत. निती संगीताच्या क्षेत्रात सक्रिय असताना तिची बहीण शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन डान्सर आहेत.