पहिल्याच भेटीत ऋषी कपूर यांना घाबरल्या होत्या नीतू कपूर; म्हणाल्या होत्या- ते सगळ्यांना धमक्याचे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:37 IST2023-08-25T11:59:25+5:302023-08-25T12:37:59+5:30
ऋषी कपूर आणि नीतू कपूर ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.

पहिल्याच भेटीत ऋषी कपूर यांना घाबरल्या होत्या नीतू कपूर; म्हणाल्या होत्या- ते सगळ्यांना धमक्याचे...
ऋषी कपूर आणि नीतू कपूर ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘याराना’ या चित्रपटांतून ७०चं दशक गाजवलेल्या नीतू कपूर यांनी १९८० साली ऋषी कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली. या कपलचे किस्से आजही प्रेक्षकांना ऐकायला आवडतात. नीतू आणि ऋषीची पहिली भेट काही खास नव्हती. एकदा नीतू कपूर यांनी स्वतः याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, पहिल्या भेटीत ऋषी कपूर यांनी त्यांना धमकी दिली होती. यामुळे त्या घाबरल्या होत्या.
नीतू कपूर यांनी अन्नू कपूर यांना दिलेली एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ऋषी कपूर यांच्यासोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीत त्या घाबरल्या होत्या. नितू कपूर म्हणाल्या होत्या, 'ऋषी कपूर यांच्यासोबतची माझी पहिली भेट खूपच वाईट होती. सेटवर ते मला माझ्या कपड्यांवरुन आणि मेकअपवरुन चिडवायचे. मला खूप राग यायचा. ते सगळ्यांना धमक्याचे त्यावेळी मी खूप लहान होतो. मला त्यांचा राग यायचा. बॉबीच्या सुपरहिटनंतर, डिंपल कपाडियाने लग्न केले आणि ऋषीला कोणतीही नायिका उरली नाही कारण प्रत्येकजण त्यांच्यापेक्षा वयाने मोठा दिसत होता. मी एकमेव तरुण अभिनेत्री होते आणि ‘रिक्शावालानंतर त्यांचे सर्व चित्रपट माझ्याकडे येऊ लागले.'
याच मुलाखतीत नीतूने पुढे सांगितले की, ''त्यांनी लग्नापूर्वी ३ वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्या म्हणाला, 'मला नेमकी वेळ आठवत नाही पण मी अनेक चित्रपट साइन केले होते.'' 1975मध्ये नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासह ‘खेल खेल में’ हा सिनेमा केला आणि एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या लोकप्रिय जोडीने 11 सिनेमांत एकत्र काम केले. ख-या आयुष्यात पती-पत्नी म्हणून वावरताना नीतू यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ऋषी यांना सोबत केली.
ऋषी कपूर व नीतू कपूर यांना रिधिमा व रणबीर कपूर ही दोन मुले आहेत. लग्नानंतर नीतू कपूर गंगा मेरा मां चित्रपटात शेवटच्या दिसल्या होत्या. त्यानंतर त्या पडद्यापासून दूर होत्या. २००९ मध्ये त्यांनी कलाविश्वात पुनरागमन केलं. त्यानंतर त्या ‘जब तक है जान’, ‘बेशरम’, ‘स्पेशल २६’ आणि ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.