नेहा धुपियाने बॉडी शेमिंगवर सुनावले खडेबोल,प्रेग्नंसीमुळे वाढत्या वजनावर केली होती कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:33 PM2019-02-05T16:33:52+5:302019-02-05T16:35:32+5:30
गेल्यावर्षी १० मे रोजी नेहाने अंगद बेदीशी लग्न केले होते. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंसीची गोष्ट तिने लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.
नेहा धुपिया बाळाच्या जन्मानंतर तिचे मदरहुड एन्जॉय करत आहे. तिच्या प्रत्येक घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला तिने मेहरला जन्म दिला होता. मेहरच्या जन्मानंतर तिचे वजन वाढल्याचे तिने पोस्ट केलेल्या फोटोत पाहायला मिळतंय. याच फोटोंमुळे नेहा वारंवार सोशल मीडियावरही ट्रोल झाली. मात्र काही दिवसांपूर्वीच एका न्युज वेबसाईटने नेहाच्या वाढत्या वजनावर टीकाही केली होती. यावेळी मात्र नेहाचा चांगलाच पारा चढला आणि तिने शांत न बसता त्या न्युजचा स्क्रीनशॉट शेअर करत चांगलेच खडे बोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. फॅट शेमिंगला मी किती महत्त्व द्यावे हे मी ठरवेन. फक्त सेलिब्रेटीच नव्हे तर इतरांनीही या गोष्टीला इतके महत्त्व देऊ नये.
बाळाला जन्मानंतर प्रत्येक आईसाठी ती फिट राहणे,शारिरिकदृष्ट्या सक्षम असणे आणि नेहमी उत्साही राहणे गरजेचे आहे. यासाठी मी वर्कआऊट करण्याला प्राधाण्य देते. फिटनेसबाबत सजग असणे हे प्रत्येकाची गरज असल्याचे मी समजते. कारण प्रेग्नंसीनंतर हार्मोनल चेंजेसही होतात त्यामुळे वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी फॉलो केल्याचे नेहाने सांगितले आहे. तसेच एक सामाजिक भान जपत कोणाच्याही वजनावर किंवा कोणत्याही गोष्टींवर कमेंट करण्याआधी जरा विचार करा असा प्रामाणिक सल्लाही नेहाने यावेळी दिला आहे.
गेल्यावर्षी १० मे रोजी नेहाने अंगद बेदीशी लग्न केले होते. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंसीची गोष्ट तिने लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. अंगद व नेहाने इतके महिने प्रेग्नंसी का लपवली, हे कळायला मार्ग नव्हता. पण एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वत: यामागचे कारण सांगितले होते.
सुरूवातीला मी लोकांपासून जाणीवपूर्वक प्रेग्नंसीची गोष्ट लपवली. कारण लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, अशी भीती मला होती. प्रोड्यूसर आणि डायरेक्टर मला काम देणे बंद तर करणार नाही, अशीही भीती मला होती. एक चांगली गोष्ट म्हणजे, सुरूवातीच्या सहा महिन्यांपर्यंत माझे बेबी बम्प दिसले नाही. याचा मला फायदा झाला. माझी एनर्जी लेवल खूप चांगली आहे. मी यादरम्यान ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल्ड बाय नेहा’चे शूटींग संपवले,असे तिने सांगितले होते.