फ्लाईटला ७ तास उशीर; नेहा धुपियाच्या मुलाने वैतागून एअरपोर्टवरच केली ही कृती! व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 16:26 IST2024-07-26T16:25:39+5:302024-07-26T16:26:34+5:30
नेहा धुपिया एअरपोर्टवर पती आणि मुलासोबत फ्लाईटची वाट बघत थांबली होती. त्यावेळचे व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत (neha dhupia)

फ्लाईटला ७ तास उशीर; नेहा धुपियाच्या मुलाने वैतागून एअरपोर्टवरच केली ही कृती! व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया ही सर्वांची फेव्हरेट अभिनेत्री. नेहा धुपियाने आजवर 'चुप चुप के', 'तुम्हारी सुलू', 'सिंग इज किंग', 'करीब करीब सिंगल', 'अ थर्सडे' अशा सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. नेहा सोशल मीडियावर तिच्या आयुष्याबद्दल विविध अपडेट शेअर करत असते. अशातच नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर गोष्ट शेअर केलीय. एअरपोर्टवर फ्लाईटला उशीर झाल्याने नेहाने तिच्या पती - मुलासोबत काय केलं, याचे फोटो तिने शेअर केलेत.
नेहाच्या फ्लाईटला उशीर, पुढे काय झालं?
नेहा धुपियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. यात फ्लाईटला ७ तास उशीर झाल्याचं तिने सांगितलंय. यामुळे नेहा, तिचा पती आणि मुलगा तिघेही वैतागलेले दिसत आहेत. एका पोस्टमध्ये तिच्या मुलगा खिडकीतून बाहेर पावसाला बघत आहे. तर आणखी एका पोस्टमध्ये नेहाचा मुलगा गुरीकने बाबा अंगदच्या पाठीवर गुद्दे मारले आहेत. याशिवाय मुलाने हातावर स्केचपेनने खास डिझाईनही केलेलं दिसतंय. अशाप्रकारे फ्लाईटला उशीर झाला तरीही नेहा, तिचा पती अंगद आणि मुलाने वेळ मजेत घालवलेला दिसतोय.
नेहा धुपियाचं वर्कफ्रंट
नेहा धुपियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिची भूमिका असलेला 'बॅड न्यूज' सिनेमा नुकताच रिलीज झालाय. 'बॅड न्यूज' सिनेमात नेहाने कोरोना माँची भूमिका साकारली. या सिनेमात नेहा विशेष भूमिकेत झळकली. नेहा धुपियाचे 'एक चालीस की लास्ट लोकल', 'सिंग इज किंग' हे सिनेमे खूप गाजले. याशिवाय नेहाने MTV Roadies या शोचं अँकरींग सुद्धा केलेलं आहे. नेहा विविध जाहिरातींमध्येही झळकताना दिसते.