नेहा धूपियाला आजही आठवतात वडिलांचे ते शब्द...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 07:57 AM2018-03-18T07:57:16+5:302018-03-18T13:27:16+5:30
अभिनेत्री नेहा धूपियाला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण गेल्या १७ वर्षांपासून नेहा बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवून आहे. ...
अ िनेत्री नेहा धूपियाला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण गेल्या १७ वर्षांपासून नेहा बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवून आहे. आजपासून १७ वर्षांपूर्वी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन नेहा दिल्ली सोडून मुंबईत दाखल झाली होती. तिच्या या निर्णयाला वडिलांचा तीव्र विरोध होता. अलीकडे नेहाने याबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ‘मी २० वर्षांचे होते, तेव्हा मुंबईत पहिले पाऊल ठेवले होते. अभिनेत्री बनायचे, या स्वप्नाने मला घेरले होते. हे एकचं स्वप्न घेऊन मी मुंबईत आले. नाही म्हणायला, माझ्या वडिलांनीच माझे मुंबईचे तिकिट बुक केले होते. पण तू तीन महिन्यांत परत येशील. तुला एक आयएएस अधिकारी बनायचे आहे, असे पापा मला म्हणाले होते. आजही मी ते तिकिट जपून ठेवले आहे. पापांचे ते शब्द मला आजही आठवतात. गेल्या १७ वर्षांपासून मी मुंबईत आहे. या १७ वर्षांत मी खूप काही कमावले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आज मला स्वत:वर पूर्ण विश्वास आहे. मी कमावलेला हा विश्वास माझी मुंबईतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेतले, याचा मला आनंद आहे. एका पूर्णपणे अनोळखी शहरात स्वत:ची ओळख निर्माण करणे, सोपे नसतेच. पण मी ते केले. अर्थात अद्यापही मला बरेच काही करायचे आहे’.
ALSO READ : आॅडिशनमध्ये नेहा धूपियाशी अश्लील बोलणाऱ्या स्पर्धकाला धक्के मारून काढले बाहेर!
सन १९९४ मध्ये ‘मिन्नरम’ या मल्याळम चित्रपटाद्वारे नेहाने आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. यानंतर २००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला. यानंतर वर्षभराने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अलीकडे नेहा ‘हिंदी मीडियम’, ‘तुम्हारी सुलू’, ‘जुली’ आदी चित्रपटांमध्ये दिसली. सध्या एमटीव्हीवर प्रसारित होणाºया ‘रोडिज एक्स्ट्रीम’ या रिअॅलिटी शोमध्ये ती सूत्रधाराच्या भूमिकेत दिसतेय. याशिवाय तिचा टॉक शो चांगलाच गाजतोयं.