नेहा धूपिया या चित्रपटात दिसणार गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:59 PM2021-08-24T19:59:15+5:302021-08-24T19:59:39+5:30
नेहा धूपियाने आगामी चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपीने ब्लू मंकी फिल्म्ससोबतच्या आपल्या आगामी डायरेक्ट-टू-डिजिटल थ्रिलर, 'ए थर्सडे'मधील एका गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात नेहा धूपियाच्या बहुप्रतीक्षित लूकचे अनावरण केले. बेहजाद खंबाटाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 'ए थर्सडे' गुरूवारी घडणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे.
नेहा धूपियाने आपल्या सोशल मीडियावर आपला हा नवा लुक शेअर करताना लिहिले, रिअल आणि रिल लाइफमधील दरी कमी झाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया एसीपी कैथरीन अल्वारेज नामक गर्भवती असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून तिची ही अनोखी व्यक्तिरेखा पाहण्यासारखी असेल. चित्रपट एका प्ले-स्कूल शिक्षिकेच्या कहाणीवर आहे, जी १६ मुलांना बंधक बनवते. या थ्रिलरमध्ये यामी गौतम, डिंपल कपाडिया, अतुल कुलकर्णी आणि माया सराओ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 'ए थर्सडे'ची निर्मिती आरएसवीपी मूवीज आणि ब्लू मंकी फिल्म्सद्वारे करण्यात येत आहे.
नेहा धुपियाने बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर करत दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे जाहीर केले आहे. नेहा धूपियाने आणि अंगद बेदीसह १० मे २०१८ ला लग्न केले होते. लग्नानंतर काहीच महिन्यांनी तिने पहिल्यांदा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करत आपला आनंद साजरा केला होता. अंगद आणि नेहा दोघांच्या आयुष्यात गोंडस मुलीचे आगमन झाले होते. तिच्या मुलीचे नाव मेहर आहे. आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट असलेली नेहा तिचे फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.