ब्रेकअपबाबत पहिल्यांदाच बोलली नेहा कक्कड, म्हणाली..........

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 09:00 PM2018-12-15T21:00:00+5:302018-12-15T21:00:00+5:30

नेहाचे चाहते तिच्या आणि हिमांशच्या लग्नाची वाट पाहत होते. काही महिन्यांपूर्वी इंडियन आयडलच्या मंचावर हिमांश कोहलीने नेहाला प्रपोज केले होते. आणि त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर आपले प्रेम असल्याचे मान्य केले होते.

Neha Kakad spoke for the first time about the breakup, said .......... | ब्रेकअपबाबत पहिल्यांदाच बोलली नेहा कक्कड, म्हणाली..........

ब्रेकअपबाबत पहिल्यांदाच बोलली नेहा कक्कड, म्हणाली..........

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आता आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते म्हणजे नेहा कक्कड आणि हिमांशचे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. ऐवढेच नाही तर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केले आहे. 

नेहा कक्कडने पहिल्यांदाच आपले दुःख सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह शेअर केले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, "मैंने अपना सब कुछ दे दिया और मुझे बदले में मिला.... मैं शेयर भी नहीं कर सकती कि क्या मिला."नेहाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "मला नव्हते माहित की जगामध्ये इतके वाईट लोकही असतात. आता सगळं गमावून मी जागी झाले आहे. मला माहित आहे की मी एक सेलेब्रिटी आहे आणि मी असे काही लिहिणे आंही पण मीहि एक माणूसच आहे ना. आज मी पुरती कोलमडले आहे म्हणून मला माझ्या फीलिंग्स कंट्रोल करता येत नाहीये."

 

दिल्लीत राहणाऱ्या हिमांश कोहलीने 'यारीया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात नेहाने 'सनी-सनी' हे गाणे गायले होते. याच सेटवर या दोघांची मैत्री झाली होती.

ऑनस्क्रीन पहिल्यांदाच हिमांशने दिली होती आपल्या प्रेमाची कबुली !

इंडियन आयडॉलमध्ये ‘शादी स्पेशल’ भागात या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी नेहाला आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी हिमांशला आमंत्रित केले होते. आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता आणि ती वेड्यासारखी हसत होती. सेटवरील तो एक सुंदर क्षण होता, जेव्हा नेहाने मंचावर जाऊन जगासमोर ही कबुली दिली की तिच्यासाठी हिमांश फक्त मित्र नाही तर त्यापेक्षा जास्त आहे. तिने हे देखील सांगितले की ते दोघे पहिल्यांदा ‘आज ब्लू है पानी पानी’ या उडत्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी भेटले होते. हे गीत नेहाने म्हटले होते. नेहा हे देखील म्हणाली की जगात हिमांश इतक्या चांगल्याप्रकारे तिला अन्य कोणी समजून घेत नाही आणि ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे. तर हिमांश कोहली म्हणाला, “प्रेम नेहमी मैत्रीपासून सुरू होते आणि नेहा माझ्यासाठी मित्रापेक्षा जास्त आहे. तिच्याकडून ही कबुली ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो आणि मला वाटते आजच तो दिवस आहे.”

Web Title: Neha Kakad spoke for the first time about the breakup, said ..........

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.