शूटिंगदरम्यान अचानक अभिनेत्याच्या मागे लाटणं घेऊन धावली नेहा कक्कर, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 07:28 PM2019-12-12T19:28:46+5:302019-12-12T19:29:53+5:30

नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतो आहे.

Neha Kakkar And Rohit Khandelwal Viral Video From The Set Of Puchda Hi Nahin | शूटिंगदरम्यान अचानक अभिनेत्याच्या मागे लाटणं घेऊन धावली नेहा कक्कर, व्हिडिओ होतोय व्हायरल

शूटिंगदरम्यान अचानक अभिनेत्याच्या मागे लाटणं घेऊन धावली नेहा कक्कर, व्हिडिओ होतोय व्हायरल

googlenewsNext

इंडियन आइडल शोची परीक्षक नेहा कक्कर खूप चर्चेत असते. नेहा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिच्या गाण्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. तसेच तिचे सोशल मीडियावरील पोस्ट खूप व्हायरल होत असतात. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत नेहा तिच्या कोस्टारला लाटण्याने मारताना दिसत आहे.  


हा व्हिडिओ नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओत नेहा सोबत रोहित खंडेलवालदेखील दिसतो आहे. व्हिडिओसोबत नेहाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, हा सीन्स ऑफिशिएल व्हिडिओ अल्बममध्ये नाही. 


खरेतर रोहित आणि नेहाच्या 'पुछदा ही नहीं' या व्हिडिओ अल्बमला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता व्हायरल होत असलेला व्हिडिओमधील सेट हा याच गाण्याचा आहे. हा व्हिडिओ नेहाने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत नेहा रोहितच्या मागे लाटणं घेऊन मागे धावताना दिसली. तिचे चाहते या व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत.


नेहा बालपणापासून गायन क्षेत्रात आहे. तिने २००६ साली सिंगिंग रिएलिटी शो इंडियनमध्ये सहभागी झाली होते. नेहा शोमध्ये विजेती झाली नव्हती. मात्र त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. त्यानंतर आता ती शोमध्ये परीक्षक म्हणून दिसते आहे. 


काही दिवसांपूर्वी ती आधीचा बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे ती चर्चेत आली होती. ब्रेकअपनंतर ती कित्येकदा स्टेज परफॉर्मन्सवेळी भावूक झालेली पहायला मिळाली.

Web Title: Neha Kakkar And Rohit Khandelwal Viral Video From The Set Of Puchda Hi Nahin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.