नेहा कक्करने असा साजरा केला पहिलाच करवा चौथ, फोटो अन् डान्स व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 16:13 IST2020-11-05T16:12:46+5:302020-11-05T16:13:38+5:30
नेहा कक्करचे लग्नाचे व्हिडीओ आणि फोटोजही सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहे. तसेच नेहाने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींप्रमाणेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा व्रत केला.

नेहा कक्करने असा साजरा केला पहिलाच करवा चौथ, फोटो अन् डान्स व्हिडीओ व्हायरल...
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. तिचे लग्नाचे व्हिडीओ आणि फोटोजही सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहे. तसेच नेहाने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींप्रमाणेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा व्रत केला.
नेहाने २४ ऑक्टोबरला रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केलं. लग्नानंतरचं हे तिचं पहिलंच करवा चौथ होतं. यावेळी तिच्या फॅन्सच्या नजराही तिच्या करवा चौथकडे लागली होती. नेहाने यावेळीही फॅन्सना निराश केलं नाही आणि करवा चौथच्या निमित्ताने एका व्हिडीओ आणि फोटो शेअर केले.
या व्हिडीओत नेहा रोहनप्रीतसोबत डान्स करताना दिसत आहे. नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल झाला. यात दोघेही 'मेहंदी दा रंग' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना दोघेही क्यूट दिसत आहेत. नेहाचा हाही अंदाज तिच्या फॅन्सना फार आवडलाय.
सोबतच नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंहचा हा व्हिडीओ त्यांच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओत नेहा सुपरहिट पंजाबी गाणं 'इल्लीगल वेपन'वर धमाकेदार भांगडा करताना दिसत आहे. व्हिडीओत तिने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप घातला आहे. ज्यात ती सुंदर दिसत आहे.