नेहा कक्कर म्हणाली, तू माझा आहेस...; अखेर नेहूप्रीतने दिली प्रेमाची कबुली
By रूपाली मुधोळकर | Updated: October 9, 2020 12:25 IST2020-10-09T12:22:16+5:302020-10-09T12:25:31+5:30
रोहनप्रीत म्हणाला, आय लव्ह यू सो मच...

नेहा कक्कर म्हणाली, तू माझा आहेस...; अखेर नेहूप्रीतने दिली प्रेमाची कबुली
बॉलिवूडची लोकप्रिय सिंगर नेहा कक्करने अखेर प्रेमाची जाहिर कबुली दिलीच. होय, रोहनप्रीतवरचे प्रेम तिने कबुल केले. गेल्या काही दिवसांपासून नेहा व रोहनप्रीत यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. नेहा या महिन्याच्या अखेरिस रोहनप्रीतसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या होत्या. आता खुद्द नेहानेच सोशल मीडियावर एक गोड फोटो आणि एका गोड कॅप्शनसह या प्रेमावर शिक्कामोर्तब केले.
नेहाने रोहनप्रीतसोबतचा एक फोटो शेअर केला. ‘तू माझा आहेस...,’ असे या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले. सोबत ‘नेहूप्रीत’ असा हॅशटॅगही दिला. सध्या नेहूप्रीतचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
रोहनप्रीत म्हणाला, आय लव्ह यू सो मच...
नेहाच्या या पोस्टवर रोहनप्रीतनेही कमेंट केली आहे. ‘बाबू, आय लव्ह यू सो मच, मेरा पुत, मेरी जान... हो मी फक्त तुझाच आहे,’ असे त्याने लिहिले आणि सोबत खूप सारे हार्टइमोजीही पोस्ट केलेत.
गुपचुप उरकली रोका सेरेमनी?
नेहा कक्कर लग्नाच्या चर्चा सध्या जोरदार आहे. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हायरल झालेला फोटो बघून नेहाचा रोका झाला असा अंदाज तिचे फॅन्स लावतायेत. नेहा पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग सोबत 24 ऑक्टोबरला लग्न करणार आहे. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत.
या फोटोत नेहा आणि रोहनप्रीत एका सोफ्यावर बसलेले दिसतायेत. नेहाच्या हातात बॅग आहे आणि त्यात काही गिफ्ट्स दिसतायेत. फोटोत नेहा आणि रोहनप्रीत यांनी एकमेकांचा हात पकडलेला दिसतोय. हा फोटो पाहून दोघांच्या साखरपुडा झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आणखी रंगल्या आहेत.
कोण आहे रोहनप्रीत सिंग?
आपल्या आवाजाने तरूणाईला वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत असते. कधीकाळी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अनेक प्रयत्नानंतर नेहा ब्रेकअपच्या या दु:खातून बाहेर आली. यानंतर ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर असा काही ड्रामा रंगला की नेहा उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत लग्न करणार, अशा चर्चा रंगल्या. गेल्या काही दिवसांपासून नेहा व रोहनप्रीतच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. नेहा या महिन्याच्या अखेरिस लग्न करणार असे मानले जात आहे. ई-टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता नेहाचा होणारा पती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर रोहनप्रीत सिंहचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते.
नेहा कक्करने रोहनप्रीतसोबत गुपचुप उरकली रोका सेरेमनी? फोटो झाले व्हायरल
‘या’ एका अटीवर चित्रपटात काम करणार नेहा कक्कर