भाड्याची खोली ते कोटींचा स्वत:चा बंगला, पाहा बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकाचा थक्क करणार प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:02 AM2020-03-07T11:02:44+5:302020-03-07T11:07:14+5:30
या छोट्या खोलीत आईने टेबल लावून किचन तयार केले होते.
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. नेहाचा इथं पर्यंतचा प्रवास खूपच रोमांचकारी होता. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती नेहाचे बालपण गेले. नेहा देवीच्या जागरणामध्ये भजनं गायची. यासाठी तिला केवळ 500 रुपये मिळायचे. पण आज तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले.
नेहाने ऋषिकेशमध्ये एक बंगला खरेदी केले आहे. या गोष्टीची माहिती नेहाने इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत दिली. नव्या बंगल्यासोबत नेहाने तिच्या जुन्या घराचा फोटोदेखील शेअर केला आहे. फोटो शेअर करताना नेहाने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. ''हा बंगला आहे जो आम्ही ऋषिकेशमध्ये खरेदी केला आहे. दुसरा फोटो त्या खोली बाहेरचा आहे जातं आमचं संपूर्ण कुटुंब राहायचं. या छोट्या खोलीत आईने टेबल लावून किचन तयार केले होते. ही खोली आम्ही भाड्याने रहायचो आणि आज या शहरात आमचं स्वत:चा बंगला झाला आहे. माझ्या कुटुंबीयांचं आणि फॅन्सचे मी आभार मानते.''
इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणार आहे. ज्या कार्यक्रमाने आपल्याला एक ओळख मिळवून दिली, त्याच कार्यक्रमात इतकी महत्त्वाची भूमिका बजावायला नेहाला मिळाली. नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ अकरावीत शिकत होती. या कार्यक्रमाचे तिला विजेतेपद मिळवता आले नसले तरी या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
नेहाची आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली आहेत. सध्या ती इंडियन आयडलमध्ये परीक्षकाची भूमिका बजावतेय.