सोशल मीडियाला नेहा कक्करने केले अलविदा, म्हणाली -...मी मरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 07:54 PM2020-06-23T19:54:32+5:302020-06-23T19:55:08+5:30

गायिका नेहा कक्करने सोशल मीडियापासून लांब होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तिने लिहिलेल्या पोस्टकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

Neha Kakkar said goodbye to social media, said -... I will not die | सोशल मीडियाला नेहा कक्करने केले अलविदा, म्हणाली -...मी मरणार नाही

सोशल मीडियाला नेहा कक्करने केले अलविदा, म्हणाली -...मी मरणार नाही

googlenewsNext

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला जवळपास एक आठवडा उलटला आहे. त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे बॉलिवूडमधील नेपोटिझमला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे डिप्रेशनमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अशातच प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने सोशल मीडियामधून काढता पाय घेतला आहे. मात्र तिने लिहिलेल्या पोस्टकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

नेहा कक्कर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नेहाने तिच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. ब्रेकअप झाल्यावर नेहाने सोशल मीडियावर व्यक्त होत भावनांना वाट मोकळी केली होती. मात्र आता तिने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिने ही माहिती दिली. मी इथून बाहेर पडते, पण मरणार नाही असे तिने म्हटले आहे.


नेहाने इंस्टाग्रामवर सांगितले की, मी पुन्हा शांत झोपण्यासाठी जात आहे. ज्यावेळी जगात सगळे चांगले घडू लागेल तेव्हा मला झोपेतून उठवा. या नव्या जगात जिथे प्रेम, आदर, स्वातंत्र्य, काळजी, मजामस्ती, स्वीकृती आणि चांगली माणसे असतील. या जगात द्वेष, घराणेशाही, मत्सर, जजमेंट्, हिटलर्स, खून, आत्महत्या आणि वाईट माणसे सार्‍यांना थारा नसेल. काळजी करु नका, मी मरणार नाही आहे, फक्त काही काळासाठी या सगळ्यांपासून लांब जात आहे.

Web Title: Neha Kakkar said goodbye to social media, said -... I will not die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.