भीक मागणार्या मुलांनी अचानक कारला घेरले, पाहून ढसाढसा रडली Neha Kakkar
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 15:10 IST2021-12-11T15:10:03+5:302021-12-11T15:10:29+5:30
Neha Kakkar तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरते. अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे नेहासोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भीक मागणार्या मुलांनी अचानक कारला घेरले, पाहून ढसाढसा रडली Neha Kakkar
तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय बॉलीवुडची गायिका नेहा कक्कर हिने. नेहा सध्या एका सिंगिंग रियालिटी शोची जज आहे. शिवाय तिने बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.नेहा कक्कर(Neha Kakkar) ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. घरची हलाखीची परिस्थिती असतानाही यशाच्या ध्येयानं पछाडलेल्या नेहाने आपल्या आवाजाच्या जादूने सार्यांवर मोहिनी घातली आहे.मोठ्या मेहनतीने तिने स्वतःची यशस्वी गायिका अशी ओळख निर्माण केली. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये ती मानधन घेते. एखाद्या सिनेमात तिला गाणे कंपोज करण्यासाठी घेतले गेले तर ती दोन ते तीन लाख रुपये महिन्याला घेते.
गायनातील यशामुळेच नेहाने काही वर्षांपूर्वी मुंबईच्या वर्सोवा येथे 3BHK फ्लॅट खेरदी केला होता. लग्नाआधी नेहा अपार्टमेंटमध्ये राहत होती. फ्लॅट खरेदी केला त्यावेळी त्याची किंमत 1.2 कोटी रुपये इतकी होती. नेहाकडे आठ महागड्या आलिशान कार आहेत. आज नेहा51.80 कोटीहून अधिक संपत्तीची मालकीण आहे. अनेकदा नेहा तिच्या स्ट्रगलच्या सुरुवातीचे दिवसाविषयी बोलताना दिसते. तिचे किस्से सांगताना ती भावूक झाल्याचे अनेकदा चाहत्यांनी पाहिलंय.
नेहा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरते. अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे नेहासोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नेहा तिच्या कारमध्ये बसलेली दिसतेय. कार पाहताच तिथे भीक मागत गुजराण करणार्या मुलांचा घोळका तिच्या कारच्या भोवती जमा होत असल्याचे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल.मुलांचा घोळका पाहून नेहा त्यांना पैसे देते. नेहा सगळ्या मुलांना ५००-५०० रु देते. हे पाहून मुलांची गर्दी हळूहळू वाढतच जाते. वाढती गर्दी पाहून नेहा अस्वस्थ होऊन रडू लागते. सध्या नेहाचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. चाहते नेहाचे कौतुकही करत असल्याचे पाहायला मिळतंय.