12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच फ्लॉप सिनेमांबाबत बोलला हा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 06:23 PM2019-10-30T18:23:30+5:302019-10-30T18:31:07+5:30
काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याचा मुलीसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अभिनेता नील नितिन मुकेशचा बायपास रोड 1 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात तो एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. नील 20017 मध्ये श्रीराम राघवन यांच्या जॉनी गद्दार या थ्रीलर सिनेमातून करिअरची सुरुवात केली. यानंतर तो न्यूयॉर्क, 7 खून माफ, डेविड सारख्या अनेक सिनेमांमध्ये दिसला होता.
समीक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतूक केले. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, नील नितिन मुकेशचे म्हणणे आहे की, फिल्म इंडस्ट्री एक बॉक्सिंग मॅचप्रमाणे आहे दर शुक्रवारी तुम्हाला जाणीव होते की एकतर तुम्ही हार स्वीकारा किंवा जीव तोडून मेहनत करा. तुम्हाला उठून जिंकण्यासाठी जीव तोडून मदत करावी लागते. फिल्म इंडस्ट्रिने मला शिकवलं की तुम्हाला स्वत: ला इथं सिद्ध करावी लागते. पुढे तो म्हणाला, 12 वर्षांच्या करिअरमध्ये मला श्रीराम, विशाल भारव्दाज आणि कबीर खान सारख्या अनेक दिग्दर्शकांसोबत काम करायला मिळाले.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, बायपासचे दिग्दर्शन नमन नितिन मुकेश करतोय. नमनने याआधी बिजॉय नांबियार आणि अब्बास मस्तान यांच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. अनेक जाहिरातीही त्याने दिग्दर्शित केल्या आहेत.
नमनचा हा चित्रपट एक थ्रीलर ड्रामा आहे. नीलसह अभिनेत्री शमा सिकंदर यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहे. अदा शर्मा, गुल पनाग आणि रजित कपूर यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. लहान भावासोबत काम करताना साहजिकच नील प्रचंड उत्साहित आहे. नील यात एका दिव्यांगाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नील-नमन या जोडीचा ‘बाईपास रोड’ प्रेक्षकांना कोणता प्रवास घडवतात आणि या प्रवासाचे फलित काय, ते बघूच.