पापा की बेटी सेम टू सेम म्हणत बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला लेकीसोबतचा क्युट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 17:39 IST2021-03-13T17:05:59+5:302021-03-13T17:39:32+5:30
बाप लेकीच्या जोडीचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.

पापा की बेटी सेम टू सेम म्हणत बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला लेकीसोबतचा क्युट फोटो
अभिनेता नील नितिन मुकेशने आपल्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये आलेल्या श्री राम राघवन या एक्शन थ्रीलर सिनेमाने केली. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे समीक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते. तसेच या श्री राम राघवनमधील त्याच्या अभिनयासाठी फिल्मफेअर अॅवॉर्ड्समध्ये निवेदित सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणून त्याला नामांकन देखील मिळाले होते. नील इन्स्टाग्रामवर बराच अॅक्टिव्ह असतो. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाशलवर नजर टाकली तर सहज लक्षात येते.
नील मुलगी नुरवी सोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. नीलने आपल्या लहानपणीचा आणि नुरवीचा एक फोटो क्लोज करुन इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पापा की बेटी सेम टू सेम असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाप लेकीच्या जोडीचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
नील हा सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलचे पापा नितीन मुकेश हेही गायक आहे. मात्र नीलने आजोबा वा पापाच्या मार्गावर न जाता वेगळी वाट चोखाळली.त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. नील अखेरचा ‘वजीर’ या सिनेमात दिसला होता. याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’,‘आ देखें जरा’,‘शॉर्टकट रोमियो’,‘प्लेअर्स’,‘जॉनी गद्दार’, साहो यासारख्या चित्रपटात त्याने अभिनय केला आहे. केले पण म्हणावे तसे यश त्याला मिळू शकले नाही. शेवटचा नील 2019 मध्ये आलेल्या 'बायपास रोड'मध्ये दिसला होता.