Video Viral : पाहा, ‘साहो’चा आणखी एक धम्माल अॅक्शन व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 19:17 IST2018-10-28T19:16:23+5:302018-10-28T19:17:19+5:30
आता ‘साहो’चा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अभिनेता नील नितीन मुकेश याने आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Video Viral : पाहा, ‘साहो’चा आणखी एक धम्माल अॅक्शन व्हिडिओ
बाहुबली स्टार प्रभास लवकरच ‘साहो’ या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रभासच्या बर्थ डेला या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज झाला़ या मेकिंग व्हिडिओने चाहत्यांना जणू वेड लावले. २४ तासांत सुमारे १० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. दमदार अॅक्शनने भरलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत १५ लाखांवर हिट्स मिळाले आहेत. आता या चित्रपटाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अभिनेता नील नितीन मुकेश याने आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटात नील नितीन मुकेश निगेटीव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रद्धा कपूरही यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहे.
‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘साहो’नंतर प्रभासने पुन्हा एकदा साऊथचाच एक चित्रपट साईन केला आहे. दिग्दर्शक के के राधाकृष्ण यांचा हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण लवकरच या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल सुरू होणार आहे.