ना ऐश्वर्या अन् नाही संगीता बिजलानी, ही होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड, तिच्या प्रेमात वेडापीसा झाला होता अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:10 IST2025-01-09T12:09:52+5:302025-01-09T12:10:42+5:30
Salman Khan : संगीता बिजलानी ही सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड होती, असे तुम्हाला वाटत असेल.तर हे चुकीचे आहे. कारण संगीता बिजलानी ही पहिली नाही तर सलमान खानची दुसरी गर्लफ्रेंड होती. चला तर मग आपण जाणून घेऊयात ती सुंदर महिला कोण होती, जिला पाहून भाईजान प्रेमात पडला होता.

ना ऐश्वर्या अन् नाही संगीता बिजलानी, ही होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड, तिच्या प्रेमात वेडापीसा झाला होता अभिनेता
संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) ही सलमान खान(Salman Khan)ची पहिली गर्लफ्रेंड होती, असे तुम्हाला वाटत असेल.तर हे चुकीचे आहे. कारण संगीता बिजलानी ही पहिली नाही तर सलमान खानची दुसरी गर्लफ्रेंड होती. चला तर मग आपण जाणून घेऊयात ती सुंदर महिला कोण होती, जिला पाहून भाईजान प्रेमात पडला होता. सलमान खान तिच्यासाठी कॉलेजच्या बाहेर तासन् तास उभा असायचा. पण मग मध्येच संगीता बिजलानी आली आणि सगळं संपलं.
बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजेच सलमान खानने फिल्मी करिअरला सुरुवात केल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. ऐश्वर्या रायपासून कतरिना कैफपर्यंत त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. अनेकदा त्याला हा प्रश्न विचारला जातो, सलमान तू लग्न कधी करणार? अशा प्रकारे तो खूप आनंदी असल्याचे त्याने अनेकवेळा सांगितले आहे. पण संगीता बिजलानीच्या आधीही भाईजानने कोणावर तरी मनापासून प्रेम केले होते. ही मुलगी दुसरी कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांची नात शाहीन जाफरी होती. शाहीन सलमानला कुठे भेटली आणि त्यांचे प्रेम कसे फुलले ते आम्ही तुम्हाला सांगतो.
संगीता बिजलानीची एन्ट्री झाली अन्...
सलमानच्या या प्रेमाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सलमानच्या पहिल्या प्रेमकथेची संपूर्ण माहिती जसिम खान यांनी लिहिलेल्या 'बिइंग सलमान' या बायोग्राफीत देण्यात आली आहे. सलमान खानचे हे पहिले प्रेम त्याच्या कॉलेजच्या काळातील आहे, तो अभिनेता होण्यापूर्वीचा. त्यावेळी सलमान खान फक्त १९ वर्षांचा होता. त्या दिवसांत त्याची लाल रंगाची स्पोर्ट्स कार अनेकदा सेंट झेवियर्स कॉलेजच्या बाहेर पार्क केलेली दिसायची. त्याची पहिली गर्लफ्रेंड शाहीन जाफरी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होती. सलमानचे वेड पाहून शाहीनही त्याच्यावर इंप्रेस झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांनाही हे जोडपे आवडले. पण त्यानंतर या नात्यात संगीता बिजलानी आली.
संगीता आणि सलमानचंही झालं ब्रेकअप
वास्तविक सलमान खान मुंबईतील एका हेल्थ क्लबमध्ये जात असे. संगीता बिजलानीही तिथे यायची. १९८० मध्ये मिस इंडिया राहिलेल्या संगीता बिजलानीचे बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत ब्रेकअप झाले होते. संगीता एकटीच होती. सलमानची संगीतासोबत मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांची जवळीक खूप वाढली. त्याचवेळी शाहीनला 'कॅथे पॅसिफिक एअरलाइन्स'मध्ये नोकरी मिळाली आणि ती सलमानपासून दूर गेली. दरम्यान, सलमान आणि संगीता यांचे नाते इतके घट्ट झाले की दोघेही लग्नाला तयार झाले. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती, पण नंतर संगीता आणि सलमान यांच्यात सोमी अली आली आणि त्यांचे लग्न मोडले. दोघांचे ब्रेकअप झाले. मात्र, आजही सलमान खान संगीता बिजलानीचा चांगला मित्र असून, सुख-दु:खात नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहतो.
सध्या या अभिनेत्रीला भाईजान करतोय डेट?
सोमीनंतर सलमान खानच्या आयुष्यात ऐश्वर्या राय, कतरिना कैफ ही नावंही आली, मात्र नंतर सलमाननं सगळ्यांशी ब्रेकअप केलं. सध्या चर्चा आहे की सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर आहे जिला तो डेट करत आहे.