ना बॉबी देओल, ना संजय दत्त..अन् नाही इमरान, हा आहे सर्वात महागडा व्हिलन, मानधनाचा आकडा पाहून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 05:31 PM2024-03-06T17:31:54+5:302024-03-06T17:33:14+5:30
एकेकाळी खलनायकी भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांची फीही नायकांपेक्षा कमी होती. पण आज खलनायकही तितक्याच महत्त्वाच्या भूमिका बजावतात आणि कधी कधी नायकांपेक्षाही जास्त लाइमलाइटमध्ये येतात. आज खलनायकही नायकांइतकी तगडं मानधन घेऊ लागले आहेत.
चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता की नायक लोकप्रिय असायचा आणि खलनायकाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. खलनायकी भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांची फीही नायकांपेक्षा कमी होती. पण आज खलनायकही तितक्याच महत्त्वाच्या भूमिका बजावतात आणि कधी कधी नायकांपेक्षाही जास्त लाइमलाइटमध्ये येतात. आज खलनायकही नायकांइतकी तगडं मानधन घेऊ लागले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का सर्वाधिक मानधन घेणारा खलनायक कोण?
आपण ज्या स्टारबद्दल बोलत आहोत त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि त्याचे चाहतेही खूप आहेत. हा अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेत पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी त्याने १५० कोटी रुपये फीस घेतल्याचे सांगितले जात आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून यश आहे.
यशने रामायणसाठी घेतलं इतकं मानधन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश तिवारी यांनी त्यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यासाठी यशची निवड केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारणार असून साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश खलनायकाच्या रुपात बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, यश नितेश तिवारीच्या रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारण्यासाठी १५० कोटी रुपयांचे मानधन घेत आहे. अशा परिस्थितीत यश हा सर्वाधिक मानधन घेणारा खलनायक ठरला आहे.
मानधनाच्याबाबतीत यशने अनेक कलाकारांना टाकलं मागे
यशने खलनायक म्हणून मानधन घेण्यात अनेक कलाकारांना मागे टाकले आहे. नाग अश्विनच्या कल्की 2898 मध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी कमल हसनने २५ कोटी रुपये फी घेतली होती. यापूर्वी विजय सेतुपतीने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी २१ कोटी रुपये घेतले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील इतर सर्वोच्च खलनायकांमध्ये सैफ अली खानचे नाव आहे ज्याने 'आदिपुरुष'साठी १० कोटी रुपये घेतले आणि इमरान हाश्मीने 'टायगर ३'साठी १० कोटी रुपये घेतले. संजय दत्तने केजीएफ २ साठी ८-९ कोटी रुपये आणि पुष्पा २ साठी फहद फासिलने ६ कोटी रुपये मानधन आकारले होते.