ना चंकी पांडे, अन् नाही गोविंदा, 'आंखें'मध्ये सर्वाधिक मानधन होतं माकडाचं, राहिला होता ५ स्टार हॉटेलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 11:17 AM2024-12-04T11:17:56+5:302024-12-04T11:18:44+5:30
Aankhen Movie : मल्टिस्टारर चित्रपट 'आंखे' हा १९९३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदा आणि चंकी पांडे दोघेही दुहेरी भूमिकेत होते, पण डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार दुसराच होता.
१९९३ मध्ये, चंकी पांडे (Chunky Panday) आणि गोविंदा (Govinda) अभिनीत एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाच्या झंझावातात अनेक चांगले चित्रपट धुळीला मिळाले. हा चित्रपट होता 'आंखे' (Aankhen Movie). मल्टिस्टारर चित्रपट 'आंखे' हा १९९३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदा आणि चंकी पांडे दोघेही दुहेरी भूमिकेत होते, पण डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार दुसराच होता.
अलिकडेच गोविंदा, चंकी पांडे आणि शक्ती कपूर कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये, चित्रपटाच्या स्टारकास्टने खुलासा केला की ब्लॉकबस्टर 'आंखे'साठी कोणत्याही अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला सर्वाधिक फी मिळालेली नाही, तर चित्रपटासाठी सर्वात जास्त रक्कम माकडाला मिळाली आहे.
माकडाला मिळालं सर्वाधिक मानधन
या चित्रपटात चंकी पांडे आणि गोविंदासोबत माकड अनेक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसला होता. या चित्रपटाच्या सेटवरील स्टोरी सांगताना शक्ती कपूर आणि चंकी पांडे म्हणतात की या चित्रपटासाठी माकडाला त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले. 'आंखे'च्या सेटवरील आपल्या संस्मरणीय क्षणांची आठवण करून देताना शक्ती कपूर म्हणतात की, चित्रपटात दोन नव्हे तर तीन नायक होते. चंकी पांडे, गोविंदा आणि माकड.
माकडाला ५ स्टारमध्ये मिळाली होती रूम
शक्ती कपूरच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देताना चंकी पांडे म्हणाला की माकडाला त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते आणि गोविंदाही हसला आणि त्याला सहमती दिली. गोविंदा म्हणाला, ‘आम्हाला पैसे मिळाले नव्हते’. शक्ती कपूर म्हणाला की, 'माकडाला सन अँड सँड ५ स्टार हॉटेलमध्ये खोलीही देण्यात आली होती'. हा कॉमेडी ॲक्शन चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटात रितू शिवपुरी, शिल्पा शिरोडकर आणि रागेश्वरी लूंबा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते आणि अनीस बज्मी यांनी निर्मिती केली होती.