ना डायबिटीस, अन् नाही बीपी, विकी कौशलला आहे असा आजार जो कधीच सोडणार नाही साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:39 IST2024-10-30T16:38:56+5:302024-10-30T16:39:54+5:30
Vicky Kaushal : विकी कौशलने सांगितले की, त्याला एक आजार आहे जो आयुष्यभर त्याच्यासोबत राहणार आहे.

ना डायबिटीस, अन् नाही बीपी, विकी कौशलला आहे असा आजार जो कधीच सोडणार नाही साथ
आलिया भट(Alia Bhatt)ने अलीकडेच खुलासा केला की तिला एडीएचडी नावाच्या आजाराने ग्रासले आहे. ती जास्त काळ कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही. विक्की कौशलनेही अनेकवेळा खुलासा केला आहे की, तो देखील घाबरण्याच्या आजारामुळे ग्रस्त आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) म्हणतो की, त्याला अनेकदा नर्व्हस वाटते आणि त्याला कसे सामोरे जायाचे हेदेखील सांगितले होते.
अलीकडे, हार्पर बाजारशी बोलताना, अभिनेत्याने सांगितले की तो चिंताग्रस्ततेचा कसा सामना करतो. तो म्हणतो, 'एका दिग्गज अभिनेत्याने मला सल्ला दिला की याला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्याशी मैत्री करणे. ते नेहमीच तुमच्या सोबत असणार आहे, त्यामुळे हे सत्य स्वीकारलेले बरे.
विकी कौशलला आहे दिग्दर्शनात रस
विकी कौशलचा असा विश्वास आहे की त्याच्यासाठी क्रिएटिव्हपणे व्यस्त राहणे खूप महत्वाचे आहे. त्याला दिग्दर्शनाच्या दुनियेत खूप रस असल्याचे तो सांगतो. चित्रपट कसे बनतात यात त्याला खूप इंटरेस्ट आहे. मात्र, दिग्दर्शनाबाबत बोलताना त्याने आता दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही विचार केला नसल्याचे सांगितले. चित्रपटसृष्टीतील बदलाबद्दल बोलताना विकी कौशलने आपली उत्सुकता व्यक्त केली. इंडस्ट्रीत नवीन लोकांना संधी मिळत आहे. त्यांना ओळख मिळत आहे आणि प्रेक्षकांनाही ती खूप आवडत आहे.