ना शाहरुख, ना सलमान, रजनीकांत ठरेल भारतातील सर्वात महागडा अभिनेता, Jailer साठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 02:20 PM2023-09-01T14:20:59+5:302023-09-01T14:29:34+5:30
रजनीकांत हे देशातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेतेही बनले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. १० ऑगस्ट रजनीकांत यांचा 'जेलर' सिनेमा रिलीज झाला. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा तब्बल 600 कोटी पार नेला आहे. जेलरने जगभरात ६00 कोटींची कमाई केली आहे. याचदरम्यान, चित्रपटात काम करण्यासाठी रजनीकांत यांनी नेमकं किती मानधन घेतलं याचा आकडा समोर आला आहे. जो ऐकून चाहते हैराण झालेत.
रजनीकांत हे देशातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेतेही बनले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत यांना जेवढे मानधन मिळालं तेवढं कदाचित एखाद्या बॉलिवूड अभिनेत्यालाही मिळालं नसेल. ही माहिती फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयन यांनी दिली असून, त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. रजनीकांत यांच्य जेलरच्या मानधनाबाबत मनोबाला विजयन यांनी लिहिले आहे की, 'कलानिधी मारन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना दिलेल्या १०० कोटी रुपयांचा धनादेश असल्याची माहिती समोर येत आहे.'
पुढे त्यांनी लिहिले की, जलरच्या नफ्यातील शेअरिंगचा चेक होता. रजनीकांत यांना या सिनेमात काम करण्यासाठी ११० कोटींचं मानधन देण्यात आलं होतं. एकूण 210 कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशाप्रकारे रजनीकांत हे भारतातील सर्वात महागडे कलाकार ठरले आहेत. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
जेलरच्या कलेक्शनबद्दल बोलायचे तर, हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट ठरला आहे. KGF 2 आणि बाहुबली 2 या यादीत सर्वात वर आहेत. 10 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.