We Want Sacred Games2 ! सोशल मीडिया झाला क्रेजी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 07:52 PM2018-07-26T19:52:11+5:302018-07-26T19:55:24+5:30

नेटफ्लिक्सची पहिली ओरिजनल भारतीय वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’ने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. या वेबसीरिजचे आठ एपिसोड लोकांनी पाहिले आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. 

netflix web series audience demand second season #wewantsacredgames2 |  We Want Sacred Games2 ! सोशल मीडिया झाला क्रेजी!!

 We Want Sacred Games2 ! सोशल मीडिया झाला क्रेजी!!

googlenewsNext

नेटफ्लिक्सची पहिली ओरिजनल भारतीय वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’ने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. या वेबसीरिजचे आठ एपिसोड लोकांनी पाहिले आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. परिणामी प्रेक्षक ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. केवळ इतकेच नाही तर आम्हाला ‘सेक्रेड गेम्स2’ पाहिजे, अशी मागणी प्रेक्षकांनी लावून धरली आहे. सोशल मीडियावरही ‘#WeWantSacredGames2’ ट्रेंड करतो आहे. याद्वारे ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे सीझन आणण्याची मागणी केली जात आहे. अर्थात ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे सीझन कधी येणार, हे अद्याप ठरलेले नाही. पण यामुळे निर्मात्यांवरचा दबाव मात्र वाढला आहे.
‘सेक्रेड गेम्स’च्या दुस*या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार, तूर्तास एवढीच बातमी आहे.
‘सेक्रेड गेम्स’वरचे काही मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स बघून तुमचे हसून हसून पोट दुखल्याशिवाय राहणार नाही. 

यातील ‘सिर्फ त्रिवेदी बचेगा’ हा डायलॉग प्रंचड लोकप्रीय झाला आहे. या डायलॉगवरचे मीम्सही पोट धरून हसवणारे आहेत.

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुबरा सैत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या पुस्तकावर आधारीत ही वेब सीरीज आहे. नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेतील काही दृश्यांत माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आशय आहे, त्यामुळे ते काढून टाकावेत अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे त्यामुळे ही मालिका वादात सापडली होती.

 

Web Title: netflix web series audience demand second season #wewantsacredgames2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.