'काय अवस्था करुन आलाय'; आईच्या अंत्यविधीला पोहोचलेला उदय चोप्रा ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 10:59 IST2023-04-21T10:58:47+5:302023-04-21T10:59:20+5:30
Uday chopra: उदयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

'काय अवस्था करुन आलाय'; आईच्या अंत्यविधीला पोहोचलेला उदय चोप्रा ट्रोल
अभिनेत्री राणी मुखर्जी हिची सासू आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांचं गुरुवारी निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी अखरेचा श्वास घेणाऱ्या पामेला यांच्यावर पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे पामेला यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात सध्या पामेल यांचा लेक आणि अभिनेता उदय चोप्रा याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इतंकच नाही तर त्याच्या दिसण्यावरुन लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
गेल्या काही काळापासून उदय चोप्राने कलाविश्वापासून फारकत घेतली आहे. इतकंच नाही तर तिचा सोशल मीडियावरील वावरही कमी झाला आहे. यामध्येच आता त्याच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे. उदयचं वजन कमालीचं वाढलं असून तो जाड झाला आहे. त्यामुळे त्याच्या दिसण्यावरुन लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
काय म्हणाले ट्रोलर्स
'हा असा कसा मुलगा आहे', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'आता तुला जेठालालची भूमिका सुद्धा मिळणार नाही', 'काय होतास आणि काय झालास', 'तुझे सिक्स पॅक अॅब्ज कुठे गेले', 'बापरे किती जाड झाला', अशा कितीतरी कमेंट करत उदयला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
काहींनी केलं उदयचं समर्थन
'अरे त्याची आई गेलीये निदान याचं तरी भान ठेवा', 'त्याने आईला गमावलंय आणि तुम्हाला त्याच्या वजनाचं पडलंय', 'त्याचं सात्वंन करायला जमत नसेल तर निदान नावं तरी ठेऊ नका', असं म्हणत काहींनी उदयचं समर्थन केलं आहे.
दरम्यान, आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा ही पामेला यांची दोन मुलं असून राणी मुखर्जी त्यांची सून आहे. गेल्या काही दिवसांपासून पामेला या आजारी होत्या. त्यामुळे त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या यशराज फिल्म्सच्या ‘द रोमँटिक्स’ या डॉक्युमेंट्रीत पामेला यांची शेवटची झलक दिसली होती.