Udit Narayan : उदित नारायण यांना नेटकऱ्यांनी दिला 'सीरियल किसर'चा टॅग, व्हायरल होतायेत जुने व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:24 IST2025-02-03T18:24:16+5:302025-02-03T18:24:55+5:30

Udit Narayan : उदित नारायण यांचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ते अनेक सेलिब्रिटींना किस करताना दिसत आहेत.

Netizens tag Udit Narayan as 'serial kisser', old videos go viral | Udit Narayan : उदित नारायण यांना नेटकऱ्यांनी दिला 'सीरियल किसर'चा टॅग, व्हायरल होतायेत जुने व्हिडीओ

Udit Narayan : उदित नारायण यांना नेटकऱ्यांनी दिला 'सीरियल किसर'चा टॅग, व्हायरल होतायेत जुने व्हिडीओ

गायक उदित नारायण (Udit Narayan) यांनी त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका महिला चाहतीची किस घेतल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये, ज्येष्ठ गायक टिप टिप बरसा पानी परफॉर्म करताना दिसत आहे. चाहतीसोबत फोटो काढल्यानंतर गायकाने तिच्या ओठांवर किस केली. त्यामुळे सोशल मीडियावर लोकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी पाहायला मिळाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, उदित यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात ते अलका याज्ञिक, श्रेया घोषाल आणि करिश्मा कपूरसह इतर सेलिब्रिटींना किस करताना दिसत आहेत. उदित नारायण यांचे हे जुने व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इंडियन आयडॉलच्या एपिसोडमधील एका व्हिडिओमध्ये, उदित नारायण अलका याज्ञिकच्या गालावर किस करताना दिसत आहेत, ज्यामुळे तिला धक्का बसतो आणि लगेचच तिथून निघून जाते. एका व्हिडिओमध्ये, अलका अस्वस्थ दिसत आहे जेव्हा उदित यांनी पुन्हा तिचे चुंबन घेतले. एका प्रसंगी उदित यांनी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जिंकल्यानंतर श्रेया घोषालच्या गालावर किस केली. उदित नारायण यांनी करिश्मा कपूरला किस केले, जी चकित दिसली होती.


''आम्ही सुसंस्कृत लोक आहोत...''
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांनी त्या किसबद्दल सांगितले. ते म्हणाले, "चाहते खूप वेडे आहेत, नाही का? आम्ही तसे नाही, आम्ही सुसंस्कृत लोक आहोत." काही लोक त्याचा प्रचार करतात आणि त्याद्वारे आपले प्रेम दाखवतात. गर्दीत बरेच लोक आहेत आणि अंगरक्षकही आमच्यासोबत आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळतेय असे वाटते, म्हणून कुणी हस्तांदोलनासाठी हात पुढे करतो, कुणी हाताचे किस घेतो… हे सगळे वेड असते. त्यावर इतके लक्ष देऊ नये."

वर्कफ्रंट
उदित नारायण हे प्रसिद्ध गायक आहेत ज्यांनी तेलुगू, कन्नड, तमिळ, बंगाली, सिंधी, ओरिया, भोजपुरी, नेपाळी, मल्याळम आणि आसामी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. कयामत से कयामत तक, रंगीला, पुकार, धडकन, लगान, देवदास, वीर-जारा आणि स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी प्रशंसा मिळविणाऱ्या उदित नारायण यांना चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

Web Title: Netizens tag Udit Narayan as 'serial kisser', old videos go viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.