वादग्रस्त विधानावरून नेटकऱ्यांनी घेतली रिचा चढ्ढाची अजब शाळा!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:38 PM2020-08-30T17:38:59+5:302020-08-30T17:41:26+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिची नेटकऱ्यांनी ट्विटरवर शाळा घेतली आहे. तिला चांगलेच फैलावर घेतल्याचे समजतेय.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय संशयितांची कसून चौकशी करत आहेत. यासंदर्भात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच सुशांतला ड्रग्सचे व्यसन होते अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडूनही याप्रकरणी तपास सुरु आहे तसेच दुसरीकडे सुशांतसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सुशांत ड्रग्सचे सेवन करत नव्हता असे सांगितले. आता बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विट करत मारिजुआना (गांजा) घेण्याचे फायदे सांगत वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर तिच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला असून ट्विटरवर युजर्सनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे.
The time when the world is waking up to the medicinal benefits of marijuana, we have boomers frothing at the mouth shouting DRUGS! 🙄 Please do some research, stop insulting this gift of Soma. Ignorant people do not have the right to insult our heritage or faith. https://t.co/7UgWpgQmab
— TheRichaChadha (@RichaChadha) August 29, 2020
अभिनेत्री रिचा चढ्ढा ही अधुनमधूनच पण अत्यंत वादग्रस्त विधान करताना दिसते. सध्या सुशांत मृत्यूप्रकरणी वेगवेगळे प्रकार समोर येत असताना रिचाने टिवट केल्याचे समजतेय. या ट्विटमध्ये ती मारिजुआनाला ड्रग्स बोलण्यांवर संतापली आहे. ‘ज्यावेळी संपूर्ण देशात मारिजुआनाचे (गांजा) औषधी फायदे समोर येत आहेत तेव्हा आपल्यातले काही अडाणी त्यांना ड्रग्सची उपमा देत आहेत. कृपया थोडा अभ्यास करा आणि निसर्गाकडून मिळालेल्या भेटीचा अपमान करु नका. अज्ञानी लोकांना आपल्याला लाभलेला वारसा आणि विश्वासाचा अपमान करण्याचा अधिकार नाही,’ या आशयाचे ट्विट रिचा चढ्ढाने केले आहे. तिच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला असून ट्विटरवर काही युजर्सनी तिला चांगलेच सुनावले आहे.
— TheRichaChadha (@RichaChadha) July 19, 2020
युजर्स म्हणतात, ‘गांजाचा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जातो हे जरी खरं असलं तरी त्याचा वापर मर्यादित स्वरुपात करणे अपेक्षित असते. तुम्ही मनात येईल तेव्हा गांजाचं सेवन करणे हे व्यसनच आहे. बहुधा तूच आधी थोडा अभ्यास करणे गरजेचे असून अर्धवट ज्ञान हे कधीही घातकच आहे,’ असे एका ट्विटर युजरने सुनावले आहे.