VIDEO : ये क्या? बिल्कुल भी होश नही...,  सारा अली खानचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 05:54 PM2022-09-18T17:54:10+5:302022-09-18T17:55:47+5:30

Sara Ali Khan : साराचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी साराला ट्रोल करायला सुरूवात केलीये...

Netizens troll a 'drunk' Sara Ali Khan for 'touching' security guard | VIDEO : ये क्या? बिल्कुल भी होश नही...,  सारा अली खानचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

VIDEO : ये क्या? बिल्कुल भी होश नही...,  सारा अली खानचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

googlenewsNext

सैफ अली खान व अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खान (Sara Ali Khan) आज बॉलिवूडची मोठी स्टार आहे. फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिनं स्वत:ची ओळख निर्माण केली. सारा पापाराझींची सुद्धा आवडती आहे. सारा दिसली रे दिसली की, कॅमेरे घेत पापाराझी तिच्यामागे धावतात. कॅमेऱ्यात कैद झालेला साराचा एक असाच व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी साराला ट्रोल करायला सुरूवात केलीये.
साराचा हा व्हिडीओ मुंबईच्या बैस्टियन रेस्टॉरंटबाहेरचा आहे. तिच्यासोबत ‘मलाल’ची अभिनेत्री शरमिन सेगल दिसतेय.  हा व्हिडीओ पाहून सारा नशेत असल्याचा दावा युजर्स करत आहेत.

व्हिडिओत सारा डेनिम जम्प सूटमध्ये दिसतेय. मैत्रिणीचा हात पकडून ती अगदी सांभाळून सांभाळून चालताना दिसतेय. कॅमेऱ्यासमोर पाहून ती मीडियाला हात हलवून हाय म्हणते. यानंतर ती रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री घेते. यादरम्यान तिचा हात सिक्युरिटी गार्डच्या हाताला लागतो. पण त्याकडे दुर्लक्ष करत ती आत जाते. यावरून सारा सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
सारा नशेत असल्याचं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. अजिबात शुद्धीवर नाहीये, आपला हात सिक्युरिटी गार्डला लागला, याचंही तिला भान नाहीये, असं एका युजरने लिहिलं. ती पूर्णपणे नशेत आहे. मोठ्या मुश्किलीने चालतेय, अशी कमेंट एका युजरने केली. याचमुळे बॉलिवूडला बायकॉट करायला हवं, अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला.

सारा अली खान सध्या तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळेही चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडलं जात आहे. अलीकडे दोघंही एका डिनर डेटवर सोबत दिसले. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी सारा कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबतही साराचं नाव जोडलं गेलं होत.

Web Title: Netizens troll a 'drunk' Sara Ali Khan for 'touching' security guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.