हीच का माणुसकी , ड्राइव्हरला दिलेल्या अशा वागणूकीमुळे सुजैन खान ट्रोल, वाचा नक्की काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 20:04 IST2021-07-14T19:58:45+5:302021-07-14T20:04:31+5:30
एरव्ही चाहत्यांची वाहवा मिळवणारी सुजैन खान आता मात्र नेटीझन्सच्या संतापाला कारणीभूत ठरली आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सुजैनला जबरदस्त ट्रोल केलं गेलंय.

हीच का माणुसकी , ड्राइव्हरला दिलेल्या अशा वागणूकीमुळे सुजैन खान ट्रोल, वाचा नक्की काय घडलं
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खान अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर सुजैनदेखील प्रचंड एक्टीव्ह असते. तिचे हटके ग्लॅमरस फोटो शेअर करत नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत असते. अभियक्षेत्रात काम करत नसली तरी तिचा थाट हा कोण्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाहीय.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला या गोष्टीचा अंदाज येईलच. तिच्या फोटोंवरुन ती किती आलिशान आयुष्य जगचे याचाही अंदा येईल. सोशल मीडियावर तिच्याही फॉलोअर्सची संख्या प्रचंड मोठी आहे. हृतिक रोशनमुळेच तिलाही पब्लिसिटी मिळत असते. दोघांचा घटस्फोट झाला असला तरी आजही एकत्रच वेळ घालवताना दिसतात.
एरव्ही चाहत्यांची वाहवा मिळवणारी सुजैन आता मात्र नेटीझन्सच्या संतापाला कारणीभूत ठरली आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सुजैनला जबरदस्त ट्रोल केलं गेलंय. सुजैनचा हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला राग आल्याशिवाय राहणार नाही. पाहणारेही सुजैनच्या व्हिडीओवर टीका करताना दिसत आहेत.
त्याचे झाले असे की, समोर आलेल्या व्हिडीओत सुजैन तिच्या कारमधून बाहेर उतरत असताना ड्राइव्हरच्या हातातली छत्री घेऊन निघून गेल्याचे दिसतंय. मात्र तिचा ड्राइव्हर पावसातच तसाच भिजत उभा होता. हीच गोष्ट नेटीझन्सना चांगलीच खटकली आणि नेटकऱ्यांनी सुजैनला ट्रोल करायला सुरुवात केली. प्रचंड संताप व्यक्त करत सुजैनला ट्रोल केले जात आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटीझन्स व्हिडीओ पाहिल्यावर सुजैनबद्द राग व्यक्त करत प्रचंड टीका करताना दिसत आहेत.