New Controversy : रजनीकांत यांना कुणी म्हटले ‘घुसखोर’?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 06:18 PM2017-01-17T18:18:56+5:302017-01-17T18:21:14+5:30
सुपरस्टार रजनीकांत म्हणजे साऊथच्या चित्रपटांचा ‘देव’. अशावेळी रजनीकांतविरोधात कुणी चकार शब्द काढावा, म्हणजे वादाला निमंत्रणच म्हणायचे. अभिनेत्याचे नेता बनलेले ...
स परस्टार रजनीकांत म्हणजे साऊथच्या चित्रपटांचा ‘देव’. अशावेळी रजनीकांतविरोधात कुणी चकार शब्द काढावा, म्हणजे वादाला निमंत्रणच म्हणायचे. अभिनेत्याचे नेता बनलेले सरथ कुमार यांनी असाच एक वाद ओढवून घेतला आहे. रजनीकांत यांच्याविरोधात केलेल्या त्यांच्या वक्त्व्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. केवळ राजकीय गोटातच नाही तर टिष्ट्वटरसह सर्व सोशल मीडियावर या वादाचे तीव्र पडसाद उमटलेत.
आता हा वाद नेमका काय, ते आम्ही तुम्हाला सांगतो. एका मॅगझिन लॉन्चला रजनीकांत यांनी भाषण केले. जयललितांच्या निधनानंतर राज्यात सुरु असलेल्या अस्वाभाविक घडामोडी बघता, मला मॅगझिनचे माजी संपादक चो रामास्वामी यांची आठवण आली, असे रजनीकांत आपल्या भाषणात म्हणाले. रजनीकांत यांच्या या विधानाकडे शशिकला यांनी अण्णाद्रमुकची धूरा सांभाळण्याच्या घटनाक्रमाशी जोडून बघितले गेले. यानंतर सरथ कुमार यांनी रजनीकांत यांना राजकारणातील ‘घुसखोर’ संबोधले. रजनीकांत यांनी बोलण्यापूर्वी जरा विचार करून बोलावे. रजनीकांत एक भला माणूस आहे. पण ते एखादा राजकीय पक्ष स्थापन करणार असतील तर सर्वप्रथम मी त्याचा विरोध करेल. त्यांनी मल्याळम आणि कन्नड चित्रपटांत काम केलेय. पण याचा अर्थ हा नाही की, त्यांनी केरळ व तामिळनाडूत निवडणूक लढवावी. तामिळनाडूत केवळ एकच तामिळ मुख्यमंत्री असेल, असे सरथ म्हणाले. त्यांचा इशारा रजनीकांत कर्नाटकी असण्याकडे होता. तामिळनाडूत कायम रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाचा विरोध होत आला आहे. या विरोध करणाºयांत जयललिता यांचा अण्णाद्रमुक हा पक्ष आघाडीवर राहिला आहे.
सरथ कुमार यांनी रजनीकांत यांना घुसखोर संबोधताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. केवळ संतप्त प्रतिक्रियाच नाही तर टिष्ट्वटरवर सरथ यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करण्यात आला. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी सरथ यांचे पोस्टर्स जाळत निषेध नोंदवला.