​महिलांसाठी नव्हे तर युवकांसाठी डिझाईन होतेय नवी फॅशन - हुमा कुरेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 12:47 PM2017-01-28T12:47:42+5:302017-01-28T18:17:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा आगामी ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने ती ...

New fashion is designed not for women but for women - Huma Qureshi | ​महिलांसाठी नव्हे तर युवकांसाठी डिझाईन होतेय नवी फॅशन - हुमा कुरेशी

​महिलांसाठी नव्हे तर युवकांसाठी डिझाईन होतेय नवी फॅशन - हुमा कुरेशी

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा आगामी ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच तिने फॅशनबद्दल आपले मत व्यक्त करून खळबळ माजविली आहे. आपल्या फॅशनबद्दल जागरुक असलेल्या हुमाला आजच्या काळातील डिझायनर महिलांसाठी नव्हे तर युवकांसाठी कपडे डिझाईन करीत असल्याचे वाटू लागले आहे. 

‘जॉली एलएलबी २’च्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ घेत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार हुमा कुुरेशी म्हणाली, सध्या आघाडीचे फॅशन डिझायनर महिलांसाठी कपड्यांचे डिझाईन करीत नाहीत. तर त्यांचा पूर्ण फोकस युवकांचे कपडे डिझाईन करण्यावर आहे. हुमा आपल्या मताला दुजोरा देत म्हणाली, असे कपडे कोण घालतो, जर तुम्ही याला सुंदर म्हणत असाल तर तुमची कल्पना चुकीची आहे. सौंदर्याचे मानक कोणते हे ठरविणे कठीण आहे. कुणाला तपकिरी रंग चांगला वाटू शकतो, अर्थातच तो चांगला रंग आहे, कुणाला काळा रंग आवडतो. अर्थात तो रंग देखील चांगलाच आहे. हे कोण ठरविणार? आपण आपल्या आवडीप्रमाणे वाट्टेल तसे कपडे का घालू नये? असा सवालही तिने केला. आपण एखाद्या व्यक्तीच्या विशेषतेचा सन्मान का करू शकत नाही. प्रत्येकाची विशिष्ठ चौकट असते, असे मतही तिने मांडले. Read More : अक्षय कुमार - हुमा कुरेशीची ‘बावरा मन’ केमिस्ट्री



आपल्या आगामी चित्रपटाबद्दल हुमा कुरेशी म्हणाली, सुभाष कपूर न्दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’मध्ये आर्शद वारसीने जबरदस्त भूमिका साकारली होती. मी सुभाष कपूर यांना या चित्रपटाचा तिसरा भाग करावा असे सांगितले आहे. विशेष म्हणजे तिसºया भागात जॉलीची भूमिका एखाद्या महिलेने साकारावी. ही भूमिका मला मिळाल्यास फारच चांगले. जॉली भ्रष्ट आहे, तो लोकांना मुर्ख बनवितो मात्र अखेरीस तो सत्याची बाजू धरतो आणि ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो अशी भूमिका एखाद्या महिलेने साकारायलाच हवी. 

ALSO READ : 
​अनारकली आॅफ आरा : स्वरा भास्कर गाणार अश्लिल गाणी
लिंकअपच्या बातम्यांवर अशी काही बोलली हुमा कुरेशी!

Web Title: New fashion is designed not for women but for women - Huma Qureshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.