वरूण धवनसोबत धोनी सुरु करणार नवी इनिंग! बनणार निर्माता!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2017 07:32 AM2017-05-01T07:32:54+5:302017-05-01T13:02:54+5:30

क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रमांवर नाव कोरणारा भारताची माजी क्रिकेट कर्णधार महेन्द्र सिंह धोनी एक नवी इनिंग सुरु करतो आहे. ...

New Innings will start with Varun Dhawan Becoming the Creator !! | वरूण धवनसोबत धोनी सुरु करणार नवी इनिंग! बनणार निर्माता!!

वरूण धवनसोबत धोनी सुरु करणार नवी इनिंग! बनणार निर्माता!!

googlenewsNext
रिकेटच्या मैदानात अनेक विक्रमांवर नाव कोरणारा भारताची माजी क्रिकेट कर्णधार महेन्द्र सिंह धोनी एक नवी इनिंग सुरु करतो आहे. होय, धोनीने आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवायचे ठरवले आहे. हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रोड्यूस करण्याचा निर्णय धोनीने घेतला आहे. धोनीने या चित्रपटाचे राईट्सही खरेदी केले आहेत. या चित्रपटात वरूण धवन मेजर ध्यानचंदची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिल्यानंतर वरूणला ध्यानचंद यांच्या बायोपिकसाठी फायनल करण्यात आल्याचे कळतेय. करण सध्या ‘जुडवा2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत.
खरे तर ध्यानचंद यांच्यावरील बायोपिकची घोषणा गतवर्षीचं झाली होती. निर्माता करण जोहरने या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र काही कारणाने हा चित्रपट रखडला तो रखडलाच. आता धोनी हा चित्रपट प्रोड्यूस करणार म्हटल्यावर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता करण या चित्रपटाचा सहनिर्माता असणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
ध्यानचंद यांच्या बायोपिकद्वारे धोनी बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून पाऊल ठेवणार असेल तर मनोरंजन जगतात त्याची ही एक नवी सुरुवात ठरेल. गतवर्षी एम एस धोनी याच्या स्वत:च्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता धोनी निर्मित चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, ते बघूच.

Web Title: New Innings will start with Varun Dhawan Becoming the Creator !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.