‘लैला मजनू’च्या दोन नव्या पोस्टर्सनी वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 07:10 PM2018-07-24T19:10:00+5:302018-07-24T19:15:07+5:30
इम्तियाज अली आणि एकता कपूर ‘लैला मजनू’ या चित्रपटाची घोषणा केली आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. आज ‘लैला मजनू’चे दोन नवे पोस्टर्स रिलीज करण्यात आले.
इम्तियाज अली आणि एकता कपूर ‘लैला मजनू’ या चित्रपटाची घोषणा केली आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. आज ‘लैला मजनू’चे दोन नवे पोस्टर्स रिलीज करण्यात आले. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटात फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता आणि अगदी दोन दिवसांपूर्वी इम्तियाज अलीने या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
The mystery and the chemistry unfolds. Presenting our Laila and Majnu to the world. #LailaMajnu Trailer Out Tomorrow! #ImtiazAli@ektaravikapoor@pipreety#SajidAli@RuchikaaKapoor#PIFilms@balajimotionpic@avinashtiw85@trapss567#PyaarMeinPagalpic.twitter.com/UXTS3P10bq
— BalajiMotionPictures (@balajimotionpic) July 24, 2018
‘प्रत्येक पिढीत खरे प्रेम असते. लैला मजनू प्रत्येक पिढीत जन्मास येतात़ प्रेम तर आमच्या काळात होते.आता तर केवळ टिंडर आहे, असे जुने लोक बोलतात. पण हे खरे आहे? होय, प्रेमाचे रूप बदललेयं, कपडे बदललेतं, पण लैला मजनू आजही आहेत. प्रेमात तितकेच वेडे झालेले, मनाने तितकेच निष्पाप असलेले. प्रेम जुन्या पिढीत होते, यावर विश्वास ठेवू नका. प्रेम प्रत्येक पिढित असते, असे इम्तियाज या व्हिडिओत म्हणतोय.
Now that we have broken the ice, it’s time for the eyes to do all the talking! Presenting the second look of #LailaMajnu.
— Zee Music Company (@ZeeMusicCompany) July 24, 2018
Trailer Out Tomorrow. @ektaravikapoor#ImtiazAli@pipreety#SajidAli@RuchikaaKapoor#PIFilms@avinashtiw85@trapss567#PyaarMeinPagalpic.twitter.com/a1ZJYRSj2k
लैला मजनूची प्रेमकथा सर्वाधिक ऐतिहासिक प्रेमकथांपैकी एक आहे. याआधीही लैला मजनूच्या अमर प्रेमकथेवर बॉलिवूड चित्रपट बनला आहे. या चित्रपटात ऋषि कपूरने मजनूची भूमिका साकारली होती. आता हीच कथा एका मॉडर्न रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकता या चियत्रपटाची निर्माती आहे तर इम्तियाज अली याचा प्रेझेंटर. इम्तियाजचा भाऊ साजिद अली हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे.
लैला मजनूची प्रेमकथा आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. लैला मजनू दोघेही पाकिस्तानात राहणारे होते. श्रीमंत घराण्यातील मजनूचा गरिब कुटुंबातील लैलावर जीव जडतो. लैलाच्या भावाला तिच्या या प्रेमाबद्दल करते आणि तो मजनूची हत्या करतो. लैलाला हे कळते तेव्हा ती मजनूच्या मृतदेहाजवळ जात तिथेच आत्महत्या करते. लैला मजनूबद्दल आणखीही एक कथा ऐकवली जाते. त्यानुसार, घरच्यांना आणि समाजाला त्यांचे प्रेम मान्य नसल्याने लैला मजनू घरातून पळून गेले आणि राजस्थानच्या एका वाळवंटात पोहोचले. येथे पाण्याने तडफडून दोघांचाही मृत्यू झाला.