नायिकांनी आणला कपड्यांचा नवा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:50+5:302016-02-07T11:12:46+5:30

'हम आपके है कौन' चित्रपटात माधुरीने सलमान खानसोबत हिरव्या रंगाचा लहेंगा परिधान करुन 'दिदी तेरा देवर दिवाना' या गाण्यात ...

New trends of the clothes brought by the heroines | नायिकांनी आणला कपड्यांचा नवा ट्रेंड

नायिकांनी आणला कपड्यांचा नवा ट्रेंड

googlenewsNext
'
;हम आपके है कौन' चित्रपटात माधुरीने सलमान खानसोबत हिरव्या रंगाचा लहेंगा परिधान करुन 'दिदी तेरा देवर दिवाना' या गाण्यात केलेली धूम सार्‍यांनाच आठवत असेल. हा चित्रपट आणि हे गाणं खूप गाजलं. लग्नात त्याकाळी प्रत्येक ठिकाणी हे गाणं वाजत होतं. 'देवदास' या चित्रपटात माधुरीने परिधान केलेल्या भरजरी वेषाने सार्‍यांचीच हृदये जिंकून घेतली होती. 'आजा नचले' चित्रपटातील तिचा काळ्या रंगाचा निळी किनार असलेला लहेंगा इतका गाजला की तो खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली. काजोलचा पंजाबी लुक
'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे'मधील काजोलचा हिरव्या रंगाचा लहेंगा आजही तरुणींना आकर्षित करीत असतो. 'मेहंदी लगा के रखना' या गाण्यावेळी काजोलने घातलेल्या ड्रेसची प्रत्येक मुलगी मागणी करू लागली. काही वर्षानंतर तिने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात असाच भरजरी लहेंगा परिधान केला. तिने घातलेल्या लहेंग्यामुळे ती खूपच आकर्षक दिसली होती. दीपिकाची अर्धी साडी
दीपिका फॅशनच्या बाबतीत अगदीच दक्ष असते. ती जे काही परिधान करते ते इतरांपेक्षा वेगळं आणि एकमेव असतं. त्यामुळे तिची कपड्यांची चॉईसही वेगळी आणि ट्रेंड सेट करणारी असते. 'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये तिने अर्धी साडी परिधान केली आहे. दाक्षिणात्य पद्धतीची ती साडी इतकी लोकांना आवडली की ती फॅशन 'फॉलो' करण्याकडे अनेकांचा कल होता. 'राम लीला' चित्रपटात तिने घातलेला लहेंगा आणि लांब गोलाकार स्कर्ट सार्‍यांनाच आकर्षित करणारा होता. बर्‍याच वर्षानंतर गुजराती पद्धतीचा हा वेष लोकांना आवडला. करिनाची शरारा स्टाईल
'कभी खुशी कभी गम'मध्ये चुलबुली करिना कपूर 'बोले चुडियाँ' गाण्यावर नाचताना आपण पाहिली असेल. या गाण्यात तिने घातलेला जो लहेंगा आहे, हा मनीष मल्होत्राने डिझाईन केलाय. त्यामुळे ती आकर्षक तर दिसलीच आहे किंबहुना तिने या गाण्यात बाजीही मारलीय. जेव्हा हा चित्रपट पडद्यावर आला आणि ब्लॉकबस्टर झाला, त्यावेळी अगदी तशाच पद्धतीच्या शराराला सर्वत्र मागणी आली. अजूनही तो करिनाचा लहेंगा डिमांडमध्ये आहे. जगात कुठेही जा भारतीय पारंपरिक वेष हा नेहमीच हटके आणि सुंदर दिसतो. कोणताही ड्रेस अगदी सहजरित्या अंगावर मिरवता येईल असाच असतो. मग तो लहेंगा, साडी, कुर्ता किंवा सलवार-कमीज काहीही असो. कोणतीही मुलगी अशा पारंपरिक वेशात सुंदर दिसते. सण-उत्सवाचे दिवस आल्यानंतर प्रत्येक मुलीला आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे ही इच्छा असतेच. भारताच्या कोणत्याही भागात जा, महिला आणि तरुण मुली वेगळं काही तरी परिधान करण्यासाठी धडपडताना दिसतील. दागिने, आभूषणांनी नटण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. भारतीय वधू तर अशा दागिन्यांनी जणू मढलेलीच असते. सध्या नवरात्र सुरू आहे. दिवाळीही लवकरच येणार आहे. त्यामुळे शॉपिंगसाठी बर्‍याच मुली उत्सुक असतील. बॉलिवूडकडे बघूनच बर्‍याच वेळेस भारतीय पारंपरिक वेषभूषेत बदल होत असतात. म्हणूनच सध्या बाजारात नवीन काय आले आहे, कोणता ट्रेंड अथवा फॅशन जोरात आहे, यावर एक नजर..

Web Title: New trends of the clothes brought by the heroines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.