New Year Shocker: नंदिता दास पतीपासून विभक्त!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 03:25 PM2017-01-01T15:25:47+5:302017-01-01T15:26:51+5:30
गतवर्षी बॉलिवूडमधले अनेक ब्रेकअप्स झालीत. काही घटस्फोटही. दुर्दैवाने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडच्या आणखी एका ब्रेकअपची बातमी आली आहे. ...
ग वर्षी बॉलिवूडमधले अनेक ब्रेकअप्स झालीत. काही घटस्फोटही. दुर्दैवाने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडच्या आणखी एका ब्रेकअपची बातमी आली आहे. होय, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास हिने आपला सात वर्षांचा संसार मोडीत काढत पती सुबोध मस्कारा याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना एक सहा वर्षाचा मुलगा विहान आहे.
गेल्या काही दिवसात नंदिता व सुबोध यांच्या काहीतरी बिनसल्याची बातमी कानावर आली होती. दोघेही एकमेकांपासून विभक्त होणार, अशीही चर्चाही होती. नंदिताला याबद्दल विचारले असता, तिने कुठलेही आढेवेढे न घेता, ही चर्चा खरी असल्याचे सांगितले. ‘होय, हे खरे आहे. सुबोध आणि मी आम्ही दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. परस्पर सांमजस्याने आणि सहकार्याने आम्ही दोघे विभक्त होणार आहोत. सुबोध आणि मी दोघेही एका मुलाचे पालक आहोत. आमचा मुलगा हाच आमचा प्राधान्यक्रम असणार आहे. त्यामुळे एक पालक म्हणून आमच्या मुलाच्या आणि आमच्या खासगी आयुष्याचा आदर व्हावा, एवढीच यावेळी मी सर्वांना विनंती करेल. यात काहीही लपवण्यासारखे नाही आणि यापलीकडे काहीही सांगण्यासारखे नाही,’ असे नंदिताने स्पष्ट केले.
खरे तर आपल्या माणसापासून विभक्त होणे, हे नेहमीच वेदनादायी असते. नंदिताही याला अपवाद नाही. ‘ विभक्त होणे हे सोपे नाही. मुलं असताना तर नाहीच नाही. आम्हा दोघांसाठी तूर्तास आमचा मुलगा हा सगळ्यांत चिंतेचा विषय आहे. पण त्याच्या आनंदी व सुखी आयुष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असेही नंदिता म्हणाली.
हे नंदिताचे दुसरे लग्न आहे. २००२ मध्ये नंदिताने सौमाया सेनसोबत विवाहबद्ध झाली होती. २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर २०१० मध्ये नंदिताने सुबोध मस्कारासोबत लग्न केले होते.