डोळ्यावर गॉगल अन् शॉर्ट्समध्ये दिसली नवी नवरी, लग्नानंतर आमिर खानच्या लेकीचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 18:46 IST2024-01-11T18:46:32+5:302024-01-11T18:46:57+5:30
नव्या नवरीचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

डोळ्यावर गॉगल अन् शॉर्ट्समध्ये दिसली नवी नवरी, लग्नानंतर आमिर खानच्या लेकीचा Video व्हायरल
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) लग्नबंधनात अडकली. आधी महाराष्ट्रीयन पद्धतीने विधी, नंतर रजिस्टर मॅरेज आणि शेवटी ख्रिश्चन पद्धतीने आयरा आणि नुपूर लग्नबंधनात अडकले. नुकतीच आयरा आई रिना दत्ता आणि पती नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) विमानतळावर दिसली. यावेळी नव्या नवरीचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली.
आयरा आणि नुपूर यांचा उदयपूर येथे ग्रँड विवाहसोहळा पार पडला. भारतीय पद्धतीने नाही तर ख्रिश्चन पद्धतीने दोघांनी लग्न केलं. त्यांच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. संगीत सोहळ्यात आमिर खानने स्वत: जुनी हिंदी गाणी गात मैफिल रंगवली. तर त्याला किरण राव आणि आझादचीही साथ मिळाली. आयरा आणि नुपूरच्या ख्रिश्चन वेडिंगचेही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आयरा आणि नुपूर नुकतेच विमानतळावर दिसले. डोळ्यावर गॉगल, ब्लू टीशर्ट, ब्लॅक शॉर्ट्स, व्हाईट जॅकेट आणि शूज असा आयराचा लूक होता. तर नुपूरने शर्ट, जीन्स आणि जॅकेट तसंच कोल्हापुरी चप्पल घालून दिसला.
नव्या नवरीचा असा अवतार पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले आहे. 'वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केल्यानंतर थकलेले नवरा नवरी' अशी कमेंट एकाने केली आहे. 'लग्नानंतर नवरीची शॉर्ट्समध्ये विदाई होत आहे','कशी नवी नवरी आहे ही' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.