OMG! न्यूड फोटोशूटला असाही विरोध, रणवीर सिंगसाठी जुने कपडे गोळा करत आहेत लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 04:03 PM2022-07-26T16:03:19+5:302022-07-26T16:03:36+5:30

Ranveer Singh Nude Photoshoot : सध्या चर्चा आहे ती बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची. सध्या रणवीर जबरदस्त ट्रोल होतोय. अशात इंदूरमधील एका एनजीओने आगळ्या वेगळ्या पद्धतीने रणवीरचा विरोध केला आहे.

NGO collecting clothes for Ranveer Singh after his nude photoshoot | OMG! न्यूड फोटोशूटला असाही विरोध, रणवीर सिंगसाठी जुने कपडे गोळा करत आहेत लोक

OMG! न्यूड फोटोशूटला असाही विरोध, रणवीर सिंगसाठी जुने कपडे गोळा करत आहेत लोक

googlenewsNext

Ranveer Singh Nude Photoshoot :  सध्या चर्चा आहे ती बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटची. होय, रणवीरने बेधडक होत कॅमेऱ्याला न्यूड पोझ दिल्यात. त्याचे फोटो व्हायरल झालेत आणि सगळीकडे खळबळ उडाली. काहींनी त्याच्या या न्यूड फोटोशूटचं समर्थन केलं तर बहुतेकांनी टीका केली. सध्या रणवीर जबरदस्त ट्रोल होतोय.  रणवीरच्या या फोटोशूटला अनेक ठिकाणी विरोध  होत असून अगदी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अशात इंदूरमधील एका एनजीओने आगळ्या वेगळ्या पद्धतीने रणवीरचा विरोध केला आहे.

होय, इंदूरमधील ‘नेकी की दीवार’ या स्वयंसेवी संस्थेनं काय करावं तर  रणवीरसाठी जुने कपडे गोळा करण्याची धडक मोहिम सुरू केली आहे. संबंधित एनजीओनं  रणवीरच्या न्यूड फोटोशूटला ‘मानसिक कचरा’ म्हणत विरोध केला आहे. गरीब आणि गरजूंसाठी कपडे गोळा करणारी ही संस्था आपल्या शहरातून जुने कपडे गोळा करत आहे जेणेकरून ते रणवीर सिंगला पाठवता येईल.

 याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एनजीओने इंदूरच्या रस्त्या रस्त्यांवर काही बॉक्स उभे केले आहेत. यावर रणवीरच्या न्यूड फोटोशूटचा एक फोटो आहे. ‘माझ्या स्वच्छ इंदूरने देशातील मानसिक कचरा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं या फोटोखाली लिहिलं आहे. तर दुस-या बोर्डवर  ‘बॉलिवूड संकटात, मानसिक कचरा.’ असं लिहिलं आहे. 

 हा व्हिडीओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर रणवीरची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. ‘रणवीर भाई के लिए कपडों का दान करें, कपडों का दान महादान,’अशा आशयाच्या कमेंट्स लिहित नेटकरी हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

रणवीरविरोधात एफआयआर
दरम्यान न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंगच्या अडचणी वाढल्या आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये रणवीरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरुद्ध भादंविच्या 302 आणि आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे रहिवासी ललित टेकचंदानी यांनी रणवीरविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
 

Web Title: NGO collecting clothes for Ranveer Singh after his nude photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.