OMG : प्रियांका-निकच्या लग्नाला येणार तिची बेस्टफ्रेंड आणि ब्रिटिनच्या शाही घराण्याची सून ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:35 PM2018-08-22T16:35:35+5:302018-08-22T16:55:30+5:30
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे नातं आता ऑफिशियल झाले आहे. साखरपुड्यानंतर प्रियांका मुंबईतल्या घरी तिच्या मित्र परिवारासाठी पार्टीचे देखील आयोजन केले होते.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे नातं आता ऑफिशियल झाले आहे. साखरपुड्यानंतर प्रियांका मुंबईतल्या घरी तिच्या मित्र परिवारासाठी पार्टीचे देखील आयोजन केले होते. आता प्रियांका आणि निकच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
रिपोर्टनुसार प्रियांकाच्या लग्नात तिची बेस्ट फ्रेंड आणि ब्रिटिनच्या शाही घराण्याची सून मेगन मार्कल तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी उत्साहित आहे. रिपोर्टनुसार मेगन आपला पती प्रिन्स हॅरीला घेऊन लग्नाला हजेरी लावू शकते.
प्रियांका आणि निकने आपल्या लग्नासाठी एका खास शहराची निवडदेखील केली आहे. प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न समुद्राच्या कुशीत वसलेल्या हवाईला दोघांनीही पसंती दिली आहे. निकला समुद्र प्रचंड आवडतो. त्यामुळे याचठिकाणी हे जोडपे लग्नगाठ बांधेल, याची शक्यता अधिक आहे. हे लग्न कसे होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. पण हा सोहळा पारंपारिक हिंदू पद्धतीने होईल, असे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
नुकतेच प्रियांकाच्या आईने याबाबतचे संकेत दिले होते. मी प्रियांकावर माझे विचार लादू इच्छित नाही. पण तिचे लग्न पारंपरिक पद्धतीने व्हावे, अशी माझी इच्छा आहे. पूजा आणि रोका झालाच. आता लग्नही अशाच पद्धतीने व्हावे, असे मला वाटते. माझ्यासाठी पारंपरिक लग्नविधी महत्त्वाचे आहेत, असे प्रियांकाची आई मधू चोप्रा म्हणाल्या होत्या. प्रियांकाच्या आईची ही इच्छा बघता प्रियांका व निक भारतीय हिंदू पद्धतीने लग्न करतील, असे मानले जात आहे.