Priyanka Nick Wedding : प्रियांका-निकच्या लग्नाच्या आधी व्हायरल होणार हा व्हिडीओ कुणाच्या लग्नातला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 04:08 PM2018-12-01T16:08:21+5:302018-12-01T16:17:45+5:30

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा विवाह एखाद्या रॉयल वेडिंगपेक्षा कमी नाही आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास अयोजन करण्यात आलेले आहे

Nick jonas and priyanka chopra marriage video viral on instagram social media 1 year back saanghvi family fake | Priyanka Nick Wedding : प्रियांका-निकच्या लग्नाच्या आधी व्हायरल होणार हा व्हिडीओ कुणाच्या लग्नातला ?

Priyanka Nick Wedding : प्रियांका-निकच्या लग्नाच्या आधी व्हायरल होणार हा व्हिडीओ कुणाच्या लग्नातला ?

googlenewsNext
ठळक मुद्देया पाहुण्यांना स्पेशल पर्सनलाईज्ड चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा विवाह एखाद्या रॉयल वेडिंगपेक्षा कमी नाही आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास अयोजन करण्यात आलेले आहे. प्रियांकाच्या अनेक बॉलिवूडसह अनेक हॉलीवूडच्या पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. प्रियांका आणि निकला आपले लग्न सिक्रेट ठेवण्याचा प्लॉन होता मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.    

 

 


प्रियांका आणि निकच्या लग्नाशी संबंधीत अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येतायेत. या व्हिडीओमध्ये सगळे पाहुणे मंडळी बसून रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेताना दिसतायेत. संपूर्ण उम्मेद भवनाला लाईट्सने एखाद्या नववधू प्रमाणे साजवण्यात आले आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ प्रियांका आणि निकच्या प्री-वेडिंग सेरेमनीचा असल्याचे सांगितले जात होते मात्र तसे नाही आहे पिंकविलाच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे. गेल्या वर्षी सांघवी कुटुंबीयांच्या फॅमिली फंक्शनमधला आहे.   


प्रियांकाच्या लग्नाला काही इंटरनॅशनल स्टार हजेरी लावणार असल्याचीही खबर आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांना प्रियांका आणि निक एक खास भेट देणार आहेत. या पाहुण्यांना स्पेशल पर्सनलाईज्ड चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला ‘एनपी’ म्हणजे निक आणि प्रियांका या नावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असेल
 

Web Title: Nick jonas and priyanka chopra marriage video viral on instagram social media 1 year back saanghvi family fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.