डेटिंगबाबत प्रियंकाचा बॉयफ्रेन्ड निकचे विचार ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 05:01 PM2018-07-25T17:01:17+5:302018-07-25T17:05:53+5:30

निक जोनस हा प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाआधीही त्याचे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांसोबत अफेअर होते. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे.

Nick Jonas a boyfriend of Actress Priyanka Chopra reveals his idea of dating | डेटिंगबाबत प्रियंकाचा बॉयफ्रेन्ड निकचे विचार ऐकून व्हाल थक्क!

डेटिंगबाबत प्रियंकाचा बॉयफ्रेन्ड निकचे विचार ऐकून व्हाल थक्क!

googlenewsNext

मुंबई : बॉलिवूडसह आता हॉलिवूडची झालेली देसीगर्ल प्रियंका चोप्रा तिच्या निक जोनसच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतान तिने निकसोबत दणक्यात वाढदिवसही साजरा केला. निक जोनस हा प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाआधीही त्याचे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांसोबत अफेअर होते. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. त्याने त्याच्या या मुलाखतीमध्ये डेटिंगबाबतचे आपले विचार मांडले असून हे विचार वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

निक जोनस हा लोकप्रिय टॉक शो What Happens Live with Andy Cohen मध्ये पाहुणा म्हणून गेला होता. या शोमध्ये निक आपल्या फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. अशातच त्याचा डेटिंगबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारं होतं. निकने सांगितले की, त्याने आतापर्यत सर्वात जास्त ३५ वय असलेल्या महिलेला डेट केलंय.

या शो दरम्यान एका महिला फॅनने त्याला विचारले की, 'आतापर्यंत जितक्याही महिलांना तू डेट केलंय त्यातील सर्वात जास्त वय किती होतं?' या प्रश्नावर आधी निक हसला आणि म्हणाला की, ३३ ते ३५ वर्ष इतकं सांगितलं. 

अशातच गप्पा सुरु असताता शो चे होस्ट एंडीने चिमटा काढत विचारले की, 'कदाचित ७० वर्ष'. वयाने मोठ्या महिलांना डेट करण्याबाबत निकने सांगितले की, 'वय किती असावं यावर माझी काही लिमिट नाहीये. मी सर्वात जास्त ३३ ते ३५ वयाच्या मुलींना डेट केलंय. मला त्यांच्याकडून काय हवंय हे त्यांना माहीत असणं मला त्यांच्याकडे जास्त आकर्षित करतं'.

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका आणि निकच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. आम्ही दोघे सध्या एकमेकांना जाणून घेत आहोत अशी प्रतिक्रिया प्रियंकाने दिली होती. तर दुसरीकडे निकही आपल्या नात्याबाबत बिनधास्त बोलताना दिसतो. दोघेही लवकरच साखरपुडाही करणार असल्याचं बोललं जात आहे. 
 

Web Title: Nick Jonas a boyfriend of Actress Priyanka Chopra reveals his idea of dating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.