'या' व्यक्तीच्या संमतीनंतर निकने केलं होतं प्रियांकाला प्रपोज; बऱ्याच वर्षांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 09:37 AM2024-05-29T09:37:43+5:302024-05-29T10:12:02+5:30

निक जोनसने २०१८ मध्ये प्रियंका चोप्राला तिच्या वाढदिवशी प्रपोज केलं होतं.

Nick Jonas took Madhu Chopra's permission before proposing to Priyanka Chopra | 'या' व्यक्तीच्या संमतीनंतर निकने केलं होतं प्रियांकाला प्रपोज; बऱ्याच वर्षांनी केला खुलासा

'या' व्यक्तीच्या संमतीनंतर निकने केलं होतं प्रियांकाला प्रपोज; बऱ्याच वर्षांनी केला खुलासा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकी सिंगर निक जोनस (Nick Jonas) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगलेली असते. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या जोडीच्या लग्नाआधी त्यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली. बॉलिवूडच्या देसी गर्लसोबत लग्न करणं हे निक जोनससाठी सोपं नव्हतं. प्रियंकाला प्रपोज करण्याआधी निकला तिच्या एका जवळच्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागली होती. 

निक जोनसने २०१८ मध्ये प्रियंका चोप्राला तिच्या वाढदिवशी प्रपोज केलं होतं. पण, त्याहीआधी निक भारतात आला होता आणि त्याने प्रियंकाची आई मधु चोप्रा यांना तिचा हात मागितला होता. याचा खुलासा नुकेतच मधु चोप्रा यांनी केला. फिल्मीज्ञानशी बोलताना मधु चोप्रा यांनी सांगितलं, ' मला मनवण्यासाठी निक भारतात आला होता. तो मला डिनरवर घेऊन गेला. त्यावेळी प्रियांका सोबत नव्हती. तेव्हा त्यानं मला प्रियंकासाठी कसा मुलगा हवा आहे, हे विचारलं. मग मी त्याला मला जावयामध्ये कसे गुण हवेत, ते सांगितलं'. 

 यानंतर निकने मधु चोप्राचा हात हातात घेतला आणि प्रियंकाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मधु चोप्रा यांनी होकार दिल्यानंतर निक जोनसने प्रियंका चोप्राला लग्नासाठी विचारलं होतं. यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये दोघांनी धुमधडाक्यात लग्न थाटलं. देशासह परदेशातही या शाही विवाहसोहळ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. पहिल्यांदा या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. तर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. प्रियंका आणि निकचा सुखाचा संसार सुरू असून त्यांना मालती मेरी ही एक मुलगी आहे.

Web Title: Nick Jonas took Madhu Chopra's permission before proposing to Priyanka Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.