निक जोनास सहकुटुंब भारतात येणार प्रियांकाला भेटण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:07 PM2018-08-15T12:07:15+5:302018-08-15T12:10:32+5:30

दोन महिन्यांपूर्वी भारतात आलेला प्रियांकाचा बॉयफ्रेंड निक जोनास याच आठवड्यात पुन्हा एकदा भारतात येणार आहे. मात्र यावेळी निक एकटा येणार नसून तो सहकुटुंब भारतात येणार आहे.

Nick Jonas will come to India to meet Priyanka | निक जोनास सहकुटुंब भारतात येणार प्रियांकाला भेटण्यासाठी

निक जोनास सहकुटुंब भारतात येणार प्रियांकाला भेटण्यासाठी

googlenewsNext
ठळक मुद्देनिक जोनास याच आठवड्यात पुन्हा एकदा येणार भारतातप्रियांकाने मुंबईत आयोजन केले एका शानदार पार्टीचे

दोन महिन्यांपूर्वी भारतात आलेला प्रियांकाचा बॉयफ्रेंड निक जोनास याच आठवड्यात पुन्हा एकदा भारतात येणार आहे. मात्र यावेळी निक एकटा येणार नसून तो सहकुटुंब भारतात येणार आहे. प्रियांका आणि निक जोनास हे दोघेही १८ ऑगस्टला आपल्या साखरपुड्याची औपचारिक घोषणा कुटुंबियांसमोर करतील, असे सूत्रांकडून समजते आहे.

१८ ऑगस्टला निक जोनासचा वाढदिवस आहे. प्रियांकाने याच तारखेला मुंबईत एका शानदार पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत प्रियांकाच्या कुटुंबियांसह बॉलिवूडमधली अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत. ही पार्टी प्रियांकाने खास निक आणि त्याच्या कुटुंबियांसाठी ठेवली आहे असे म्हटले जात आहे. त्यामुळे निकचे कुटुंबीय खास लंडन आणि अमेरिकेवरून भारतात येणार आहेत. प्रियांकाच्या कुटुंबियांशी निकचे कुटुंब भेट घेणार आहे. यापूर्वी प्रियांका आणि निक दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबीयांशी भेट घेतली होती. मात्र पहिल्यांदाच त्यांचे कुटुंबातील मंडळी या पार्टीनिमित्त एकमेकांशी भेटणार आहे. प्रियांका आणि निक या दोघांनी जुलै महिन्यात साखरपुडा केल्याची चर्चा होती. मात्र या दोघांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नव्हता.

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका आणि निकच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. आम्ही दोघे सध्या एकमेकांना जाणून घेत आहोत अशी प्रतिक्रिया प्रियंकाने दिली होती. तर दुसरीकडे निकही आपल्या नात्याबाबत बिनधास्त बोलताना दिसतो. मात्र आता निक सहकुटुंब भारतात येतो आहे म्हटल्यावर साखरपुड्याची घोषणा करतील का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Nick Jonas will come to India to meet Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.