एका बोल्ड गाण्यात रेखा आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री पाहून भडकली होती रवीना टंडन, रेखाला दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 12:19 PM2021-12-11T12:19:42+5:302021-12-11T12:20:33+5:30

When Raveena Asked Rekha To Keep Her Hands Off Akshay Kumar: बॉलिवूडमधील सर्वात पॉप्युलर प्रेम कहाण्यांपैकी एक म्हणजे रवीना टंडन (Raveena Tondon) आणि अक्षय कुमारची (Akshay Kumar) होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी गुपचुपपणे साखरपुडाही केला. 

'In the night no control' When Raveena asked Rekha to keep her hands off Akshay Kumar | एका बोल्ड गाण्यात रेखा आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री पाहून भडकली होती रवीना टंडन, रेखाला दिला होता इशारा

एका बोल्ड गाण्यात रेखा आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री पाहून भडकली होती रवीना टंडन, रेखाला दिला होता इशारा

googlenewsNext

When Raveena Asked Rekha To Keep Her Hands Off Akshay Kumar: कधीकाळी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचं (Akshay Kumar) नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं अफेअर होतं आणि त्याने अनेक अभिनेत्रींची मने दुखवली अशी अफवा सुद्धा होती. बॉलिवूडमधील सर्वात पॉप्युलर प्रेम कहाण्यांपैकी एक म्हणजे रवीना टंडन (Raveena Tondon) आणि अक्षय कुमारची होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी गुपचुपपणे साखरपुडाही केला. 

मात्र, नंतर रवीनाने अक्षय कुमारवर दगा दिल्याचा जाहीरपणे आरोप केला होता आणि त्याच्यासोबतचं नातं तोडलं होतं. अक्षय कुमार आणि रवीनाने अनेक सिनेमात एकत्र काम केलं. त्यातीलच एक सिनेमा म्हणजे 'खिलाडियो का खिलाडी'. या सिनेमातील रेखा (Rekha) आणि अक्षय कुमारच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'इन द नाइट नो कंट्रोल' गाण्यात अक्षय आणि रेखाच्या रोमान्समुळे खूप चर्चा झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे रवीनाला अजिबात आवडलं नव्हतं. कारण ती त्यावेळी अक्षय कुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होते. याबाबत रवीना एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'मला नाही वाटत की, अक्षयचं रेखासोबत काही देणं-घेणं होतं. मुळात तो तिच्यापासून दूर पळत होता. अक्षयने सिनेमामुळे रेखाला सहन केलं. एकवेळ तर ती अक्षयसाठी तिच्या घरून लंच घेऊन येणार होती. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की,  हे काही बरोबर होत नाहीये'.

एका दुसऱ्या मुलाखतीत रेखा म्हणाली होती की, 'जर त्या अभिनेत्रीला माहीत आहे की, आम्ही सोबत आहोत तरी ती अक्षयच्या फार जवळ आली आहे. पण अक्षयला माहीत आहे स्थिती कशी सांभाळायची'. दरम्यान काही महिन्यांनी रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचं ब्रेकअप झालं. कारण अक्षयच्या आयुष्यात शिल्पा शेट्टी आली होती.
 

Web Title: 'In the night no control' When Raveena asked Rekha to keep her hands off Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.