लोकांना तिच्यात ‘माधुरी’ दिसली आणि तिथेच बिनसलं...! ‘या’ अभिनेत्रीनं बॉलिवूड कायमचं सोडलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 08:00 AM2022-06-16T08:00:00+5:302022-06-16T08:00:01+5:30

Bollywood : अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला आणि अचानक तिने इंडस्ट्री सोडली. कारण काय तर माधुरी... होय, ती माधुरी दीक्षित सारखी दिसायची हीच तिची चूक होती...!!

niki aneja left bollywood due to her resemblance to madhuri dixit | लोकांना तिच्यात ‘माधुरी’ दिसली आणि तिथेच बिनसलं...! ‘या’ अभिनेत्रीनं बॉलिवूड कायमचं सोडलं...!!

लोकांना तिच्यात ‘माधुरी’ दिसली आणि तिथेच बिनसलं...! ‘या’ अभिनेत्रीनं बॉलिवूड कायमचं सोडलं...!!

googlenewsNext

जगात सेम टू सेम दिसणाऱ्या अनेक व्यक्ति आहेत. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, अनिल कपूर, देवानंद अशा एक ना अनेक गाजलेल्या कलाकारांचे सेम टू सेम भासावे असे डुप्लिकेट आहेत. नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर एक अशीच अभिनेत्री झळकली होती. त्या अभिनेत्रीचं नाव होतं निक्की अनेजा (Niki Aneja ). या अभिनेत्रीबाबत तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. 90 च्या दशकात ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) हिची डुप्लिकेट अशीच तिची ओळख होती. अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला आणि अचानक तिने इंडस्ट्री सोडली. कारण काय तर माधुरी... होय, ती माधुरी दीक्षित सारखी दिसायची हीच तिची चूक होती...

निक्कीला खरं तर कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. तिला बनायचं होतं पायलट. पण भावानं तिला मॉडेलिंगचा सल्ला दिला आणि तिनं तिचा पहिला पोर्टफोलियो बनवला. तो पोर्टफोलियो पाहून तिला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या. बघता बघता ती मॉडेलिंग क्षेत्रातलं मोठ्ठं नाव बनली. अर्थात हे काही काळ. मॉडेलिंग क्षेत्रात ग्लॅमर होतं, पैसा होता, प्रसिद्धी होती. पण कदाचित निक्कीला हवी असलेली शांती नव्हती. अचानक तिने सगळं सोडलं आणि ती सगळं काही सोडून तिच्या वडिलांकडे राहायला गेली. पण नियतीने तिच्या नशीबी हिरोईन बनण्याचं आधीच लिहिलं असावं.

यावेळी तिच्या बाबांनी तिला आग्रह केला. बाबांच्या आग्रहाखातर तिने अनिल कपूरच्या ‘मिस्टर आझाद’ हा सिनेमा साईन केला. हा सिनेमा चांगला चालला. पण अनेकांना निक्कीला पडद्यावर पाहून तिच्या माधुरी दीक्षित दिसू लागली.

त्यावेळी माधुरी मोठी स्टार होती आणि निक्की एक नवखी अभिनेत्री. पण तरिही निक्कीची माधुरीसोबत निक्कीची तुलना होऊ लागली. हळूहळू माधुरीची डुप्लिकेट हा शिक्काच तिच्यावर बसला. दुसरी कुणी असती ती माधुरीची डुप्लिकेट म्हणून मिरवली असती. पण निक्की या तुलनेला कंटाळली.

याचदरम्यान तिच्या बाबांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानं निक्कीला जबर धक्का बसला आणि तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. यानंतर बऱ्याच वर्षानंतर ती पुन्हा अभिनयाकडे वळली. पण अद्यापही माधुरीची डुप्लिकेट ही ओळख तिचा पिच्छा पुरवते आहेच...
 

Web Title: niki aneja left bollywood due to her resemblance to madhuri dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.