नील नितिन मुकेशचा आगामी चित्रपट 'दशहरा'चा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:42 IST2018-10-02T17:35:47+5:302018-10-02T17:42:02+5:30
'दशहरा' चित्रपट २६ ऑक्टोंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

नील नितिन मुकेशचा आगामी चित्रपट 'दशहरा'चा ट्रेलर प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता नील नितिन मुकेश लवकरच 'दशहरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अॅक्शन, थ्रिल, रहस्यांनी भरलेला आणि अनेक गुढ गुपित असलेल्या 'दशहरा'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन या चित्रपटात दमदार अॅक्शन्स पाहायला मिळणार असल्याचे समजते आहे.
'दशहरा' चित्रपटातून नील नितिन मुकेश पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंत त्याने अनेक चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारल्या. मात्र, या चित्रपटात त्याचा पोलिसी खाक्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री टीना देसाई या चित्रपटात झळकणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवले आहे की पोलिसांची टीम एका हॉस्टेलमध्ये पोहचते. तिथे चार लोकांनी आत्महत्या केलेली असते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर समजते की आत्महत्या नसून कोणीतरी हत्या केली आहे.
गुन्हे आणि राजकारणाने प्रेरित असलेला 'दशहरा' हा चित्रपट २६ ऑक्टोंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष वात्सल्य यांनी केले आहे. या चित्रपटात नील व टीना यांच्यासह गोविंद नामदेव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाआधी नील 'वजीर' या सिनेमात दिसला होता. याशिवाय 'प्रेम रतन धन पायो', 'आ देखें जरा', 'शॉर्टकट रोमियो', 'प्लेअर्स','जॉनी गद्दार' यासारख्या चित्रपटात तो अभिनय करून चुकला आहे. नील नितीन मुकेश प्रभासच्या अपोझिट अॅक्शन करताना दिसणार आहे. 'साहो' या चित्रपटात नीलची भूमिका अतिशय दमदार असणार आहे. बाहुबलीनंतर प्रभासही या चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे.