अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांवर निम्रत कौरने सोडलं मौन, म्हणाली, "मी काहीही केलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 11:24 IST2024-10-27T11:24:16+5:302024-10-27T11:24:45+5:30
'दसवी' सिनेमात तिने अभिषेक बच्चनसोबत भूमिका साकारली होती.

अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांवर निम्रत कौरने सोडलं मौन, म्हणाली, "मी काहीही केलं..."
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एक गॉसिप जोर धरुन आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय यांच्या बिनसल्याची चर्चा असतानाच अभिषेकचं दुसऱ्याच अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सने यावर बातम्याही दिल्या आहेत. अद्याप अभिषेकने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसरीकडे ज्या अभिनेत्रीसोबत त्याचं नाव जोडलं जातंय तिने मौन सोडलं आहे.
'दसवी' सिनेमात अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निम्रत कौर (Nimrat Kaur) यांनी एकत्र काम केलं होतं. अभिषेक-ऐश्वर्या यांच्या बिनसल्याचं कारण निम्रत असल्याचं म्हटलं जात आहे. 'दसवी' सिनेमात त्यांच्यात जवळीक वाढली आणि हेच अभिषेक-ऐश्वर्यामधील दुराव्याचं कारण ठरलं. या चर्चांवर आता निम्रत कौरने भाष्य केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत ती म्हणाली, "मी काहीही केलं तरी लोक तेच बोलणार आहेत जे त्यांना बोलायचं आहे. या गॉसिपला अंत नाही. त्यामुळे मी माझ्या कामावर लक्ष देणं पसंत करेन."
निम्रत कौरला 'द लंचबॉक्स', 'पेडलर्स', 'एअरलिफ्ट' या सिनेमांमधील भूमिकांसाठी ओळखलं जातं. लवकरत ती आगामी 'सेक्शन ८४' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि डायना पेंटी यांचीही भूमिका आहे. निम्रतच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. तसंच तिचे अनेक चाहते आहेत सोशल मीडियावरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. मोजक्याच सिनेमांमध्ये दिसणारी निम्रत सध्या वैयक्तिक कारणांमुळेच जास्त चर्चेत आली आहे.