नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी गुलाबी साडी! काय त्याची खासियत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 18:05 IST2024-04-02T17:59:30+5:302024-04-02T18:05:56+5:30

आता पुन्हा एकदा नीता अंबानी बनारसी साडीमध्ये दिसून आल्या.

Nita Ambani Flaunts Indian Craftsmanship In Gulaabi Banarasi Saree That Took 40 Days To Make | नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी गुलाबी साडी! काय त्याची खासियत?

नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी गुलाबी साडी! काय त्याची खासियत?

आज नीता अंबानी हे नाव कोणाला माहित नाही असे कोणीच नाही. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नी नीता अंबानी त्यांच्या साधेपणाने आणि सौदर्यमुळे ओळखल्या जातात.  जेव्हा कधी नीता अंबानी डिझायनर कपडे आणि स्टेटमेंट ज्वेलरी परिधान करून समोर येतात. तेव्हा तर त्यांच्या श्रीमंतीच्या थाटावरून नजर हटवणे कठीण होऊन बसते. नुकतेच 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या पहिल्या वर्धापन दिनादरम्यानही नीता यांनी नेसलेल्या साडीतील त्यांच्या पारंपरिक लूकने चाहत्यांची मने जिंकली.

'NMACC'च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त नीता अंबानी यांनी 'स्वदेश'च्या कारागिरांनी बनवलेली गुलाबी बनारसी साडी नेसली होती.  हा रंग नीता यांच्यावर खूप सूट होत होता.  साडी सोनेरी जरी आणि तुतीच्या सिल्कने विणलेली होती. ज्यामुळे अगदी रॉयल लुक मिळाला. ही साडी तयार करण्यासाठी 40 दिवस लागले होते.  साडीसोबत नीता अंबानी यांनी एक स्लीक स्टेटमेंट नेकपीस घातला होता. तर त्यांनी नेकलेसला मॅचिंग कानातले परिधान केले होते. हलकी आयशॅडो, गुलाबी-टोन्ड लिपस्टिक आणि गुलाबी बिंदीसह हलका मेकअफ त्यांनी केला होता. 

नीता अंबानी यांच्या साड्यांच्या कलेक्शनमधील प्रत्येक पीस खूप खास आहे. यामुळेच त्यांनी ज्या साड्या नेसलेल्या दिसतात, त्या इतर कोणाकडेही दिसत नाहीत. प्रत्येक लूकमध्ये अत्यंत नाजूक आणि तितक्याच रॉयल अशा त्या दिसत असून ६० व्या वर्षीही त्यांच्या चेहऱ्यावरील तेज कमी झालेले नाही. त्यामुळे पाहातच राहावा असा त्यांचा लुक आहे. नीता नेहमीच सर्वांसमोर हसतमुखाने स्वत: ला प्रेझेंट करताना दिसतात. नीता अंबानी आपल्या फॅशनने चाहत्यांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाहीत. 
 

Web Title: Nita Ambani Flaunts Indian Craftsmanship In Gulaabi Banarasi Saree That Took 40 Days To Make

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.