नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 04:58 PM2023-06-08T16:58:20+5:302023-06-08T16:59:32+5:30

नितेश तिवारी यांनी काही वर्षांपूर्वीच 'रामायण' सिनेमाची घोषणा केली होती.

nitesh tiwari directorial ramayan movie on floor ranbir kapoor will be as shriram and alia playing seeta | नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा

नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सध्या आगामी 'आदिपुरुष' सिनेमाची जबरदस्त चर्चा सुरु आहे. ओम राऊतच्या या बिग बजेट प्रोजेक्टचे आतापर्यंत २ ट्रेलर आले आहेत. तर १६ जून रोजी सिनेमा प्रदर्शित होतोय. सुरुवातीला ट्रोल झालेला सिनेमा आता मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. आदिपुरुषच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एकीकडे आदिपुरुषची चर्चा असतानाच दुसरीकडे नितेश तिवारीही 'रामायण' (Ramayan) वर सिनेमा आणणार हे आधीच ठरले होते. आता नितेश तिवारींच्या (Nitesh Tiwari) रामायणात कोण स्टारकास्ट असणार याची माहिती समोर आली आहे.

नितेश तिवारी यांनी काही वर्षांपूर्वीच 'रामायण' सिनेमाची घोषणा केली होती. मात्र नंतर पुढे काहीच झालं नाही. हा सिनेमा डब्ब्यात गेला अशी चर्चा सुरु झाली. मात्र पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, रामायण मोठ्या पडद्यावर नक्कीच येणार असून पुढच्या महिन्यात सिनेमाबाबतीत अधिकृत घोषणाही केली जाईल. 

रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरला नितेश तिवारींच्या ऑफिसमध्ये पाहिले गेले. मेकर्सने श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) निवड केली आहे तर सीतेच्या भूमिकेत आलिया भट (Alia Bhat) असणार अशी चर्चा आहे. रावणाच्या भूमिकेसाठी 'केजीएफ' यश सोबत बोलणी सुरु असल्याचंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे रणबीर आलियाला मोठ्या पडद्यावर श्रीराम आणि सीतेची भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: nitesh tiwari directorial ramayan movie on floor ranbir kapoor will be as shriram and alia playing seeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.