नीतू कपूर म्हणते, करिना कपूर-खान रॉकस्टार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2017 12:03 PM2017-03-12T12:03:43+5:302017-03-12T17:33:43+5:30

आई झाल्यानंतर एका कार्यक्रमात ज्या पद्धतीने करिना कपूर-खान हिने जो परफॉर्मन्स सादर केला, त्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. करिनाची काकी ...

Nitu Kapoor says, Kareena Kapoor-Khan rockstar! | नीतू कपूर म्हणते, करिना कपूर-खान रॉकस्टार!

नीतू कपूर म्हणते, करिना कपूर-खान रॉकस्टार!

googlenewsNext
झाल्यानंतर एका कार्यक्रमात ज्या पद्धतीने करिना कपूर-खान हिने जो परफॉर्मन्स सादर केला, त्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. करिनाची काकी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनीही करिनाचे कौतुक केले आहे.
नीतू कपूर यांच्या अनुसार त्याही करिनाचा कार्यक्रम पाहण्यास उत्सुक होत्या. आपले पती आणि अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत त्या आल्या होत्या. करिनाच्या या कार्यक्रमाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मी खूपच उत्साहित आहे. ती अनेक काळानंतर कार्यक्रम करीत होती. ती आमची रॉकस्टार आहे.’ गेल्या डिसेंबर महिन्यात करिनाने तैमूरला जन्म दिला होता. त्यानंतरचा तिचा हा पहिलाच कार्यक्रम होता.



या कार्यक्रमात करिना ही अत्यंत सुंदर दिसत होती. या शोमध्ये अनेक नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला. आणखी एक विशेष म्हणजे करिना हा कार्यक्रम करण्यापूर्वी कॅटरिना  करणार होती. ती जखमी झाल्याने तिच्या जागी करिना कपूर आली.

Web Title: Nitu Kapoor says, Kareena Kapoor-Khan rockstar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.